breaking-newsताज्या घडामोडी

‘असं’ आहे महाविकास आघाडी सरकारचं खातेवाटप

मुंबई | शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार सोमवारी झाला. त्यात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची, २५ नेत्यांनी मंत्रिपदाची, तर १० जणांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. एकीकडे, त्यावरून नाराजीनाट्य रंगलं असतानाच, राजकीय वर्तुळाच्या नजरा खातेवाटपावर खिळल्या आहेत.

यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत खातेवाटप निश्चित झाले असून आज संध्याकाळपर्यंत ते जाहीर होण्याची शक्यता आहे. ‘एका मराठी वृत्त वाहिनीने’ संभाव्य खातेवाटपाची यादी जाहीर केली आहे.

शिवसेना मंत्र्यांची संभाव्य खातीः

एकनाथ शिंदे- नगरविकास, सार्वजिनक बांधकाम

सुभाष देसाई- उद्योग आणि खनिकर्म

अनिल परब- सीएमओ

आदित्य ठाकरे- पर्यावरण, उच्च व तंत्रशिक्षण

उदय सामंत- परिवहन

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची संभाव्य खातीः

अनिल देशमुख- गृह खातं

अजित पवार- अर्थ आणि नियोजन

जयंत पाटील- जलसंपदा

दिलीप वळसे पाटील- कौशल्य विकास आणि कामगार

जितेंद्र आव्हाड- गृहनिर्माण

नवाब मलिक- अल्पसंख्यांक

हसन मुश्रीफ- सहकार

धनंजय मुंडे- सामाजिक न्याय

काँग्रेसच्या मंत्र्यांचं संभाव्य खातेवाटप:

बाळासाहेब थोरात- महसूल खातं

अशोक चव्हाण- सार्वजनिक बांधकाम

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button