breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिलेला आहे”; अजित पवारांनी दिली माहिती

पक्षाच्या वरिष्ठांशी बोलून त्याबद्दलचा पुढचा निर्णय घेईन

मुंबई : नाशिक पदवीधर उमेदवारीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद चव्हाट्यावर आलाय. दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली. याबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्टिकरण दिलं आहे.

बाळासाहेब थोरातांनी राजीनामा दिला ही बातमी माध्यमांमध्ये पाहिली. मी त्यांना आज वाढदिवसानिमित्त फोन केला होता. त्यावेळी मी म्हटलो की, बाळासाहेब आज तुमचा वाढदिवस आहे. आनंदाचा दिवस आहे. तुम्हाला दिर्घायुष्य लाभावं या शुभेच्छा. मात्र, एक बातमी आहे आणि त्याविषयी आज तुम्हाला विचारावं की नको हे मला कळत नाही. कारण आज तुम्ही गडबडीत असाल.

यावर बाळासाहेब थोरात म्हणाले की, दादा मी राजीनामा दिलेला आहे. तो माझा पक्षांतर्गतचा प्रश्न आहे. मी माझ्या पक्षाच्या वरिष्ठांशी बोलून त्याबद्दलचा पुढचा निर्णय घेईन, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

दरम्यान, नाना पटोले यांनी, असं काही झालेलं नाही. बाकी राहिला विषय बाळासाहेब थोरत यांच्या राजीनाम्याचा, तर त्यांनी राजीनामा दिलेला नाही, असं म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button