ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

वायू प्रदूषण नियंत्रण पथकाने केलेल्या कारवाईत एकाच दिवसात २ लाख १७ हजारांचा दंड वसूल

हॉटेल आणि बेकरी व्यवसायांकडून १० हजार रूपये दंड वसूल

पिंपरी : बुधवार दिनांक २२ नोव्हेंबर रोजी वायू प्रदूषण नियंत्रण पथकाने केलेल्या कारवाईत एकाच दिवसात २ लाख १७ हजार ७५३ इतका दंड वसूल करण्यात आला. अ प्रभागातील वायू प्रदूषण नियंत्रण पथकाच्यावतीने हॉटेल आणि बेकरी व्यवसायांकडून १० हजार रूपये तर इतर ठिकाणी केलेल्या कारवाईत ८ हजार ५९३ रुपये असा एकूण मिळून १८ हजार ५९३ रुपये दंड वसूल करण्यात आला.

ब प्रभागामार्फत ४१ हजार १६० रुपये दंड वसुल करण्यात आला असून ७ ठिकाणी वायू प्रदूषण नियंत्रण पथकाच्या वतीने केलेल्या पाहणीत २ ठिकाणी वायू प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने जारी केलेल्या निर्देशांचे पालन न केल्याने नोटीस बजावण्यात आली आहे.

क प्रभागाच्या पथकाच्या वतीने १० ठिकाणांना भेट देण्यात आली त्यातील ३ ठिकाणी निर्देशांचे पालन न केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली असून एकूण १५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

इ प्रभागाच्या वायू प्रदूषण नियंत्रण पथकाच्या वतीने एकूण १० हजार दंड वसूल करण्यात आला. पथकाने ३ ठिकाणांना नोटीस बजावली असून २ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

फ प्रभागामार्फत एकूण ३५ ठिकाणांची पाहणी करण्यात आली. निर्देशांचे पालन न केल्याप्रकरणी ९ जणांवर कारवाई करण्यात आली असून एकूण १ लाख २५ हजार रुपये दंड वसुली करण्यात आली आहे.

ग प्रभागाच्या वतीने काल एकूण ३ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आणि १५ ठिकाणी पाहणी करण्यात आली. त्यातील ६ ठिकाणी निर्देशांचे पालन न केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

ह प्रभाग वायू प्रदूषण नियंत्रण पथकाच्या वतीने एकूण ५ हजार रुपये दंड वसुली करण्यात आली. पथकाने ४ ठिकाणी पाहणी केली आणि एका ठिकाणी निर्देशांचे पालन न केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button