breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

‘माझे वडील महिन्याभरात पुन्हा हसतील’; रोहित शर्माच्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल

Rohit Sharma Daughter : वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारतीय संघाचा पराभव झाला. हा पराभव भारतीयांच्या मनात अजूनही जाचत आहे. भारतीय संघातील खेळाडू आता हळूहळू पराभवाबाबतच्या आपल्या भावना व्यक्त करू लागले आहेत. दरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या मुलीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. रोहितला रडताना भारतीय चाहत्यांनी पाहिलं होतं. त्यामुळे हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.

एका हॉटेलमधील हा व्हिडीओ आहे. यामध्ये रोहित शर्माची पत्नी रितिका व त्यांची मुलगी समायरा हॉटेलमधून बाहेर पडताना दिसत आहेत. व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीने रोहितची मुलगी समायला विचारलेल्या प्रश्नांची दिलेलं उत्तर चांगलेच चर्चेत आहे.

हेही वाचा  –  ‘दिल्लीतली अदृश्य शक्ती महाराष्ट्र उद्ध्वस्त..’; सुप्रिया सुळेंचं विधान चर्चेत

व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीने समायराशी संवाद साधला. यात, हाय, तू कशी आहेस? या प्रश्नावर ‘छान..’असं उत्तर दिलं. यानंतर त्या व्यक्तीने तुझे वडील कुठे आहेत? असं विचारलं. यावर समायरा म्हणाली, माझे वडील त्यांच्या खोलीत आहेत. ते आत्ता शांत आहेत. पॉझिटिव्ह आहेत. पण एका महिन्यात ते पुन्हा हसतील. समायरानं दिलेल्या निरागस उत्तराचे कौतुक होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button