ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमराठवाडा

मतदान नोंदणीसाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघात दोन दिवस विशेष मोहीम

मतदान नोंदणी करायची? तर विशेष मोहिमेत सहभागी व्हा..!; मतदार नोंदणी अधिकारी तथा सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांचे आवाहन

पिंपरीः आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जास्तीत-जास्त मतदार नोंदणी करण्यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघात विशेष प्रयत्न केले जात आहेत. याच अनुषंगाने दि.25 आणि दि.26 नोव्हेंबर रोजी दोन दिवस मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत जास्तीत जास्त तरुण-तरुणी आणि ज्यांचे नाव नोंदणी करणे बाकी आहे, अशांनी सहभागी व्हावे, असे आवाहन 205 चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा कर संकलन व कर आकारणी विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगामार्फत दि.1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. या कार्याक्रमांतर्गत मतदानापासून वंचित राहिलेल्या नागरिकांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आली आहे. दि. 25 आणि दि. 26 नोव्हेंबर चिंचवड विधानसभेतील प्रत्येक मतदान केंद्रावर सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ‘Special Camp for Voters Registration’ आयोजित केला आहे.

हे फाॅर्म भरून द्यावे लागणार ..
(फॉर्म नं 6 A) परदेशी मतदार म्हणून नोंदणीसाठी
(फॉर्म नं 6 B) विद्यमान मतदारांव्दारे आधार क्रमांकाची माहिती
(फॉर्म नं 7 ) आक्षेप आणि स्वतः हटवणे
(फॉर्म नं 8 ) दुरुस्ती, स्थलांतर, डूप्लिकेट EPIC तसेच दिव्यांग व्यक्ती म्हणून चिन्हांकित करण्यासाठी हा अर्ज करावा.
चिंचवड विधानसभा मतदार संघातील ज्या मतदार यादीत नाव नोंदविलेल्या मतदारांचे लिंग गुणोत्तर 910 पेक्षा कमी आहे, त्या विविध विभागात मतदार नोंदणीचे प्रमाण वाढविण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. यासाठी वॉर्ड स्तरावर महिला, तृतीय पंथीय, बांधकाम व्यवसायातील मजूर, सर्व सहकारी सोसायट्या, औद्योगिक आस्थापनेवरील कर्मचारी वर्ग, दिव्यांग, बेघर व्यक्ती आदींसाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणीसाठी दोन दिवस विशेष मोहीम आयोजित केली आहे. या मोहिमेत जास्तीत-जास्त पात्र नागरिकांनी 205 चिंचवड विधानसभा मतदार संघ कार्यालय, यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय, थेरगाव, चिंचवड विधानसभा मतदार संघातील सर्व मतदान केंद्र येथे अर्ज जमा करावेत. तसेच ज्या नागरिकांना अर्ज भरणे शक्य नाही त्यांनी Voters.eci.gov.in व Voter Helpline App वर जावून आपली नोंदणी करावी.
– नीलेश देशमुख, 205 चिंचवड विधानसभा मतदार नोंदणी अधिकारी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button