breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई
सचिन वाझे अटक प्रकरणानंतर शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई – अँटिलिया स्फोटकं प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अधिकारी सचिन वाझे यांना झालेली अटक व त्यांच्या निलंबनानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीमध्येही काही प्रमाणात अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही वेळापूर्वीच ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. सुमारे पाऊण तासांच्या या भेटीत नेमकं काय घडलं हे कळू शकलं नाही. मात्र, अनेक प्रकारच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत.