breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘Where is Vasant More’; मनसे नेते वसंत मोरेंचं ट्वीट चर्चेत

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १७ वा वर्धापनदिनाच्या कार्यक्रम ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मात्र, या वर्धापनदिनानिमित्त पुन्हा एखदा मनसे नेते वसंत मोरे चर्चेचा विषय ठरले.

मनसे नेते वसंत मोरे आणि स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये वादाच्या चर्चा सातत्याने होत असतात. याचदरम्यान, वसंत मोरे हे मनसेच्या वर्धापनदिनानंतर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. वसंत मोरे यांनी ट्वीट करत विरोधकांना डिवचलं आहे.

वसंत मोरे यांनी ट्वीटमध्ये वर्धापन दिनातील काही फोटो शेअर केले आहेत. तसेच वर्धापन दिनामध्ये चर्चा होती Where is Vasant More, Here is Vaant More! आणि शेजारी पण नीट बघा कोण होते, असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे.

मी ज्या ठिकाणी बसलो होतो. तिथे आजूबाजूला दहा ते बारा खुर्च्या होत्या. स्वत: अमित ठाकरे हेही माझ्यासोबत होते. पण त्यानंतर ते उठून व्यासपीठावर गेले. पण मला उठताच आले नाही. मी नाराज वगेरै नाही, असं वसंत मोरे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button