breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकमहाराष्ट्र

दहावीच्या विद्यार्थ्यांना २ गुण अतिरिक्त मिळणार?’त्या’ २ प्रश्नांवरुन गोंधळ

Kapil Patil Letter to Deepak Kesarkar: आमदार कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्री आणि बोर्डाला पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी दहावीच्या विज्ञान १ विषयाच्या बोर्डाच्या पेपरमधील संदिग्ध प्रश्नाच्या दोन्ही उत्तरांना गुण देण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांना २ अतिरिक्त गुण मिळण्याची शक्यता आहे.  जर ही मागणी मान्य झाली तर विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळतील.

“दिनांक १८ मार्च रोजी इयत्ता दहावीचा विज्ञान – १ या विषयाचा बोर्डाचा पेपर झाला. यात प्रश्न १ (B) मधील i क्रमांकाच्या ‘सर्वात लहान आकाराच्या अणूचे नाव लिहा.’ या प्रश्नाच्या उत्तराबाबत विद्यार्थी आणि पालक यांच्या मनात संदिग्धता निर्माण झाली आहे. अनेक पालकांनी याबाबत माझ्याकडे चिंता व्यक्त केली आहे. वैज्ञानिकदृष्ट्या विचार करता त्याचे अचूक उत्तर ‘हायड्रोजन’ हे आहे. मात्र काही शाळांमध्ये याचे उत्तर ‘हेलियम’ असल्याचे तर काही शाळांमध्ये योग्य उत्तर ‘हायड्रोजन’ असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे,” असं कपिल पाटील म्हणाले आहेत.

हेही वाचा – आंबेगाव विधानसभा मतदारसंघात शेताच्या बांधावर मतदान जागृती

“हायड्रोजनच्या अणुत्रिजेची गणना मूल्य ५३ pm आहे तर हेलिअमच्या अणुत्रिजेचे गणना मूल्य ३१ pm आहे; कारण जेव्हा आपण डावीकडून उजवीकडे जातो तेव्हा अणुत्रिज्या कमी होण्याची शक्यता असते. तथापि, हायड्रोजन हा द्वि-आण्वीय वायू आहे तर हेलिअम हा एक-अण्वीय वायू आहे. त्यामुळे, अणुत्रिज्यांच्या गणना केलेल्या मूल्यांची तुलना करणे योग्य नाही. दोन्ही अणूंची ‘बॅन दे वॉल्झ’  त्रिज्यांची तुलना करणे अधिक योग्य ठरेल. हायड्रोजन अणूची बॅन दे वॉल्झ त्रिज्या ही १२० pm आहे तर हेलिअम अणूची वॅन दे वॉल्झ त्रिज्या ही १४० pm आहे,” असं कपिल पाटील यांनी सांगितलं आहे.

पुढे त्यांनी लिहिलं आहे की, “या प्रश्नाच्या उत्तरासंदर्भातील ही संदिग्धता लक्षात घेता या दोन्ही उत्तरांना तूर्त पूर्ण गुण देणे उचित होईल. पुढच्यावेळी सुधारित उत्तरासाठी उचित सुधारणा करता येतील. आता मुलांचे गुण कमी का करायचे ? वर्षभर मेहनतीने अभ्यास करून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायची इच्छा बाळगणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांकरिता एक गुणही अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे याबाबत तातडीने निर्णय जाहीर होणे आवश्यक आहे जेणेकरून विद्यार्थी, पालक यांचा तणाव कमी होण्यास मदत होईल”. कृपया इयत्ता दहावीच्या विज्ञान १ विषयाच्या बोर्डाच्या पेपरमधील संदिग्ध प्रश्नाच्या उत्तराबाबत खुलासा करावा अशी विनंतीही त्यांनी पत्राच्या शेवटी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button