पिंपरी / चिंचवड

तळेगाव-चाकण रोडवर अपघात: रिक्षा चालकाचा मृत्यू

पिंपरी l प्रतिनिधी

तळेगाव-चाकण मार्गावर एच पी चौक येथे अज्ञात वाहनाने एका रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. 26) रात्री सव्वादहा वाजता घडला.

राजकुमार मारुती साळुंके (वय 27, रा. महाळुंगे, ठाकरवस्ती, ता. खेड. मूळ रा. सांगली) असे मृत्यू झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. याप्रकरणी अंकुश शांताराम नाणेकर (वय 41, रा. नाणेकरवाडी, पानसरे रोड, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव-चाकण मार्गावरून जाणा-या एका अज्ञात वाहनाने मयत राजकुमार यांच्या रिक्षाला समोरून जोरात धडक दिली. यामध्ये राजकुमार यांच्या हाताला, पायाला, डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तसेच रिक्षाचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

अपघात झाल्यानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळी न थांबता, अपघाताची माहिती पोलिसांना न देता निघून गेला. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button