पिंपरी / चिंचवड

सातारा मुंबई महामार्गावर अपघात : अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

पिंपरी | प्रतिनिधी

सातारा मुंबई महामार्गावर वाकड ब्रिज जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 6) मध्यरात्री एक वाजता घडली.

पोलीस नाईक ताैसिफ महात यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत व्यक्तीची ओळख पटली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा मुंबई महामार्गावर रविवारी मध्यरात्री एक वाजता एका व्यक्तीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातामध्ये जखमी व्यक्तीचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळी न थांबता पळून गेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button