पिंपरी / चिंचवड

पूर्ववैमनस्यातून दोघांना मारहाण : दोघांवर गुन्हा दाखल

पिंपरी | प्रतिनिधी

पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून दोन जणांनी काका-पुतण्याला मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 5) रात्री निगडी येथे घडली.

सुनील तम्मा शिंगाडे (वय 25) यांनी रविवारी (दि. 6) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कृष्णा उर्फ बाळा शिवाजी वारभवन, ऋषभ नंदू जाधव (तिघेही रा. इंदिरानगर, चिंचवड स्टेशन) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंगाडे आणि आरोपी यांच्यात पूर्वी भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून शनिवारी रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास श्रमशक्ती भवन, निगडी येथे आरोपींनी आपसात संगणमत करून फिर्यादी शिंगाडे आणि त्यांचे काका यांना शिवीगाळ करून लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. तसेच झाडाच्या फांदीनेही मारहाण केली. फिर्यादी शिंगाडे यांना अज्ञात टणक वस्तूने पाठीत मारून जखमी केले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button