पिंपरी / चिंचवड

बास्केट ब्रिजचा कठडा तोडून कार पवना नदीत पडली : सुदैवाने चालक बचावला

पिंपरी | प्रतिनिधी

रावेत येथील बास्केट ब्रिजवरून कार पवना नदीत पडली. ही घटना रविवारी (दि. 6) रात्री घडली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री बास्केट ब्रिज वरून एक कार जात होती. कारला एक श्वान आडवा आला. त्यामुळे चालकाचे कार वरील नियंत्रण सुटले आणि कार नदीत पडली.

ब्रिजचा कठडा तोडून कार पवना नदीत पडली. दरम्यान कारच्या एअरबॅग उघडल्या. यामुळे चालकाला लागले नाही. चालक या अपघातात सुखरूप आहे. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कार नदीतून बाहेर काढली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button