breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

महापालिकेच्या अतिक्रमण निरीक्षकाला मारहाण, चारजणांवर गुन्हा दाखल

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण निरीक्षकाला चार जणांनी मिळून शिवीगाळ करत वजन काट्याने मारहाण केली. तसेच, अतिक्रमण वाहन अडवून त्याची तोडफोड केली.

ही घटना गुरुवारी (दि. २३) दुपारी पावणे एकच्या सुमारास नेहरूनगर येथे घडली. राजू अश्रुबा वाघमारे (वय ४१), शुभम राजू वाघमारे (वय १९), सुभाष राजू वाघमारे (वय २०) यांच्यासह एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अतिक्रमण निरीक्षक सतीश निवृत्ती लांडगे (वय ५४) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button