breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

पहिल्या टेस्टमध्ये इंग्लंडचा सनसनाटी विजय

५ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये इंग्लंडची १-० ने आघाडी

IND vs ENG 1st Test : हैदराबादमध्ये सुरु असलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीत इंग्लंडने भारताचा २८ धावांनी पराभव केलाय. ओली पोपची १९६ धावांची खेळी आणि टॉम हर्टलीने पटकावलेल्या ७ विकेट्सच्या जोरावर इंग्लडने हा विजय मिळवला.

इंग्लंडने दिलेल्या २३१ रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा २०२ रनवर ऑलआऊट झाला. चौथ्या इनिंगमध्ये एकाही भारतीय खेळाडूला अर्धशतक करता आलं नाही. रोहित शर्माने सर्वाधिक ३९ रन केले तर श्रीकर भरत आणि आर.अश्विन यांनी प्रत्येकी २८-२८ रनची खेळी केली. केएल राहुलनेही २२ रन केले. इंग्लंडकडून टॉम हार्टलीने सर्वाधिक ७ विकेट घेतल्या. जो रूट आणि जॅक लीचला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.

हेही वाचा – बिहारमध्ये ‘इंडिया’ला धक्का : ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी; भाजपा महायुतीतर्फे सत्ता स्थापनेची तयारी!

या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर भारताच्या धमाकेदार बॉलिंगसमोर इंग्लंडचा २४६ रनवर ऑलआऊट झाला. यानंतर यशस्वी जयस्वाल, रवींद्र जडेजा आणि केएल राहुल यांनी अर्धशतकं केली, त्यामुळे भारताने पहिल्या इनिंगमध्ये ४३६ रन केले, ज्यामुळे टीमला १९० रनची आघाडी मिळाली.

मॅचच्या तिसऱ्या इनिंगमध्ये ओली पोपच्या १९६ रनच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने ४२० रन केले, त्यामुळे भारताला विजयासाठी २३१ रनचं आव्हान मिळालं. इंग्लंडने १०२ ओव्हरमध्येच ४ पेक्षा जास्तच्या इकोनॉमी रेटने ४२० रन केले. मागच्या काही काळापासून इंग्लंड टेस्ट क्रिकेटमध्ये आक्रमक बॅटिंग करत आहे, ज्याला बॅझबॉल क्रिकेट म्हणून संबोधलं जात आहे. इंग्लंडच्या या बॅझबॉल क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा धुव्वा उडवला आहे. ५ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये इंग्लंडने १-० ने आघाडी घेतली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button