ताज्या घडामोडीमुंबई

कळव्यात मशिदीवरील भोंगे उतरवून नवा आदर्श, मुस्लीम बांधवांच्या निर्णयाचे कौतुक

ठाणे |  सध्या भोंग्यांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण ढवळून निघालेले पाहायला मिळाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ तारखेचे अल्टिमेटम दिल्यानंतर काल ४ तारखेचे वातावरण हे तणावपूर्ण होते. यावेळी जातीय तेढ निर्माण होऊ नये आणि कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी काल अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवत मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना नोटीसा देखील बजावल्या. या संपूर्ण सुरु असलेल्या वातावरणात जातीय सलोखा टिकवण्यासाठी आणि कुठली सामाजिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी कळव्यामधील महात्मा फुले नगर यांनी एक नवीन आदर्श घालून दिला आहे.

कळवा येथील महात्मा फुले नगर येथील मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेत आपल्या मशिदीवरील भोंगे उतरवले आहेत. कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांच्या उपस्थितीत मुस्लिम बांधवांनी हे भोंगे उतरवले आहेत.

हेही वाचा – मनसेचा दबका आवाज; कार्यकर्त्यांची धरपकड, नोटिसा, तडीपारीने आंदोलन क्षीण

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांनी मौलानांची बैठक घेतली. त्यावेळी कळव्यातील महत्मा फुले नगर येथील मशिदीचे ट्रस्टी पोलीस ठाण्यात आले आणि आपण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत असल्याचे त्यांनी सांगितलं. ११ वाजता भोंगे स्वतःहून उतरवणार असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर आज वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांच्या उपस्थितीत मलंग गोकाक, फैयाज गोकाक, कदर बिजपुरे, इब्राहीम शेख यांनी स्वतः मशिदीवरील तीन भोंगे उतरवले.

या मुस्लीम बांधवांनी घालून दिलेल्या आदर्शाचे पोलिसांनी कौतुक केले आहे. आणि त्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत अभिनंदन केले आहे. असाच आदर्श स्वतःहून सर्वांनी घ्यावा असे आवाहन यावेळी कळव्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांनी केले आहे.

हेही वाचा – मंदिरांबरोबर इतरांनाही परवानगी आवश्यक, २४-२५ मंदिरांचाच परवानगी अर्ज

ही मशीद बांधून २४ वर्ष पूर्ण झाली आहेत. या आधी ही मशीद हरदास नगर येथे होती. पुनर्वसन दरम्यान आपले पूर्वज मुरादभाई सोलापूर यांच्या नेतृत्वाखाली ही मशीद या ठिकाणी बांधण्यात आली असल्याचे फैयाज गोकाक यांनी सांगितले. जातीय सलोखा टिकवण्यासाठी मुस्लिम बांधवांकडून घेतल्या गेलेल्या या निर्णयाचं सर्वच कळवा वासियांकडून कौतुक केलं जात आहे.

 

नाशकात मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरूच; भोंगे वाजवण्याच्या प्रयत्नात असलेले मनसैनिक पोलिसांच्या ताब्यात

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button