TOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रियविदर्भ

नौदलासाठी प्रथमच खासगी कंपनीचा दारूगोळा; नागपूरमध्ये निर्मिती, पहिल्या टप्प्यातील सामग्री सुपूर्द

नागपूर | नाग भारतीय संरक्षण दलासाठी स्वदेशी बनावटीच्या शस्त्रनिर्मितीवर भर देऊन या क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर करण्याच्या प्रक्रियेनुसार भारतीय नौदल प्रथमच एका खासगी कंपनीद्वारे निर्मित दारूगोळा (स्फोटक) वापरण्यास सज्ज झाले आहे. हा दारूगोळा नागपूर येथील एका खासगी कंपनीने बनवला आहे.

भारतीय नौदलात स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत शुक्रवारी दाखल झाली. यासोबतच नौदलासाठी १०० टक्के स्वदेशी स्फोटके देखील तयार झाली आहेत. खासगी कंपनीने याची पहिली खेप नौदलाच्या सुपूर्द देखील केली आहे.

यामुळे परदेशावरील अवलंबित्व कमी होणार आहे, असा दावा संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. नागपूर येथील सोलार ग्रुपच्या इकॉनॉमिक एक्स्प्लोझिव्ह लिमिडेटने तोफेसाठी वापरली जाणारी ही ३० मिमी उच्च स्फोटके तयार केली आहेत. भंडारा आयुध निर्माणी (दारूगोळा कारखाना) येथून प्रोपेलेंट (प्रणोदक) प्राप्त करण्यात आले. त्यानंतर १२ महिन्यांच्या अल्प कालावधीत निर्मिती करून यशस्वी चाचणीही घेण्यात आली.

भारतीय नौदलाने खासगी कंपनीला तोफेसाठी आवश्यक संपूर्ण दारूगोळा पुरवठा करण्यास सांगितल्याची ही पहिलीच वेळ आहे. या कंपनीने एका वर्षांच्या आत ही मागणी पूर्ण केली. यासाठी भारतीय नौदलाने रेखाचित्रे, डिझाईन, तपासणी उपकरणे आणि दारूगोळा चाचणी इत्यादीकरिता तांत्रिक मदत केली, असे संरक्षण दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले. सोलार ग्रुप १९९५ मध्ये स्थापन झाले. त्यांनी नागपुरात कोंढाळी मार्गावर कारखाना उभारला आहे. गेल्याच आठवडय़ात या ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सत्यनारायण एन. नुवाल यांनी नौदलाचे अधिकारी व्हाईस अ‍ॅडमिरल एस.एन. घोरमाडे यांना दारूगोळय़ाची पहिली खेप सुपूर्द केली.

भारतीय नौदलाने खासगी कंपनीद्वारे निर्मित १०० टक्के स्वदेशी बनावटीचे उच्च स्फोटके मिळवल्यानंतर ‘आत्मनिर्भर’ मोहिमेत आणखी एक मैलाचा दगड गाठला गेला आहे.

– विंग कमांडर रत्नाकर सिंह, जनसंपर्क अधिकारी, संरक्षण दल.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button