breaking-newsTOP NewsUncategorizedआरोग्यगणेशोत्सव-२०२३ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

एक्सर्बिया अबोडमध्ये आग! ः आग लागल्यानंतर सगळ्यात आधी सुरक्षेची कोणती पावलं उचलायला हवीत?

  • अग्नीरोधक प्रशिक्षक तथा फायर सेफ्टी ऑफिसर धनंजय वाणी यांचे एक्सर्बिया अबोडवासियांना मार्गदर्शन!

  • एक्झर्बिया अबोड सोसायटीच्या गणेशोत्सवानिमित्त खास प्रशिक्षण शिबीर उत्साहात

वडगाव-मावळ । महान्यूज । गणेश क्षिरसागर ।

वडगाव मावळमधील जांभुळ येथील एक्झर्बिया अबोड सोसाटीमध्ये शुक्रवार 2 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 च्या दरम्यान आग लागली. ही आग बघायला सोसायटीमधील रहिवाशांनी तोबा गर्दी केली. मात्र ही आग लागलेली असताना येथील रहिवाशी महिला, पुरुष मंडळी कुतूहलाने पाहत होते. मध्ये मध्ये टाळ्यांचादेखील कडकडाट ऐकायला, पहायला मिळत होता. तर काहीजण या आगीचे क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यात व्यस्त होते. येथील सारा माहोल पाहता नागरीकांच्या चेहऱ्यावर जरा देखील भीती नव्हती अथवा चिंता दिसत नव्हती. जमलेल्या सर्व नागरीकांच्या चेहऱ्यावर फक्त आणि फक्त कुतूहल आणि कमालीचा उत्साह पहायला मिळत होता. थोड्या वेळाने ही आग विझवली. नंतर सर्वांनाच कळले की ही आग लागली नव्हती तर लागलेली आग आटोक्यात कशी आणायची. किवा समूळ कशी संपवावी याबाबत गणेशोत्सवानिमित्त अग्निरोधक प्रशिक्षक धनंजय वाणी यांचे मार्गदर्शन येथील रहिवाशांना देण्यात आले.

अग्निरोधक प्रशिक्षक, फायर सेफ्टी ऑफिसर तथा एक्झर्बिया अबोड गणेश उत्सव मंडळाचे विद्यमान अध्यक्ष धनंजय वाणी यांनी सोसायटीमधील जमलेल्या रहिवाशांना अग्निविषयी सखोल मार्गदर्शन करताना सांगितले की, आपल्या सभोवताली दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक ठिकाणी आग लागल्याचे प्रकार पाहतो. ही आग कधी, कुठे आणि कशी लागेल याबद्दल आपण काहीही सांगू शकत नाही. मात्र आग लागल्यानंतर ती आटोक्यात कशी आणता येईल किंवा ती लागण्याआधी आपण कोणती काळजी घेऊ शकतो. आग लागल्यानंतर सगळ्यात आधी सुरक्षेची कोणती पावलं उचलायला हवीत? याबाबत आपण सजग असणे अत्यंत आवश्यक आहे. या अनुषंगाने अग्नीरोधक प्रशिक्षक धनंजय वाणी यांनी प्रत्यक्षिकासह काही उपाय सूचविले.

यावेळी सोसायटीमधील रहिवाशांसह एक्झर्बिया अबोड गणेशोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष धनंजय वाणी, उपाध्यक्ष दीपक पाटील, खजिनदार पंढरीनाथ हिंगे, मार्गदर्शक सतिश कदम, प्रसन्न शिरोडकर, सचिन कासार, प्रकाश कांबळे, कार्यक्रमाचे प्रयोजक विशाल गोडसे, युवराज कदम, सल्लागार सचिन शिंदे, अमोल दिसले, सचिव दिनेश सकट, सहसचिव सत्यवान वाळुंज, कार्यवाहक गणेश क्षिरसागर, सचिन कुंभार, सुनील पवार, कृष्णा लोखंडे, चंद्रशेखर शर्मा, सुमीत पुरी, सागर माळकर, नीलेश परदेशी, बाळासाहेब लभडे, सोहेल शेख, रविंद्र उतेकर, पुंजाजी ससाणे, शरद सातपुते, रविंद्र जाधव, राजेश सोळंकी, पियुष पाटील, अजित गोळराखे, माध्यम प्रतिनिधी सार्थक कुंभार, ओम हिंगे, सुधांशु अनेच्छा, आदित्य कदम यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली.

आग लागलीये…काय कराल..?
आग ही तीन घटकांनी तयार होते. ऑक्झिजन, इंधन आणि हिट या तीन घटकांच्या एकत्रिकरणाने आगीच्या ज्वाळा तयार होतात. यापैकी एक घटक जरी कमी प्रमाणात असेल तरी आग पटकन अटोक्यात आणता येते. अशावेळी ड्राय केमिकल पॉवडरच्या बम्बचा उपयोग करावा. प्रत्येक रहिवाशी सोसायटीच्या प्रत्येक मजल्यावर एक फायर सेफ्टी सिलींडर लावलेला असतो. त्यामध्ये ड्राय केमिकल पॉवडर असते. त्याद्वारे आग आटोक्यात आणली जाते. आग जर स्वयंपाक घरातील गॅस सिलींडरद्वारे लागली तर सर्वप्रथम एखादा कपडा ओला करावा व तो त्या सिलींडर भोवती गुंडाळावा. जेणेकरून ही आग थोपविण्यास सहाय्य होते. अशा प्रकारे धनंजय वाणी यांना रहिवाशांना उपाययोजना सुचविले.

यावेळी बोलताना वाणी म्हणाले की, आग कोणत्या कारणामुळे लागली हा नंतरचा भाग मात्र आगीच्या ठिकाणी जर आपण उपस्थित असू तर तात्काळ तिथून आपल्याला बाहेर कसे पडता येईल याबाबत प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रत्येक इमारतीमध्ये इमर्जन्सी एक्झीट असते त्यावेळी त्याचा वापर करून आपण तात्काळ तेथून बाहेर पडणे आवश्यक आहे. सोसायटीमध्ये जर असेंबली पॉईंट असेल तर त्या सुरक्षित स्थळी तात्काळ रहिवाशांनी पोहोचावे. मात्र घरातून बाहेर पडताना गॅस, लाईटचे स्वीच वगैरे सर्व बंद आहेत का याची खात्री करून घेणे बंधनकारक आहे. अशी कोणती गोष्ट चालू राहिली तर आगीचा भडका होवून आग आणखीन वाढण्याची शक्यता बळावू शकते.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे या परिस्थितीमध्ये घाबरून न जाता संयमाने आणि धीराने तिथून बाहेर पडणे आवश्यक आहे तुम्ही आहात त्या ठिकाणी धुराचे प्रमाण जास्त असेल त्याचा तुम्हाला त्रास होत असेल तर ओला कपडा तोंडावर बांधून त्याच्या पासून आपले संरक्षण करावे. धूराचे प्रमाण जास्त असेल तर जमिनीवरून रांगत रांगत जाऊन त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा. अनेक ठिकाणी फायर अर्लाम असतात ते दाबून इतरांनाही धोक्याची सूचना देता येवू शकते असे केल्याने स्वतःच्या प्राणांसोबत इतरांचेही प्राण वाचवले जावू शकतात.

काळजी घेणं महत्वाचे :
अनेकदा परिस्थिती अशी असते की आपल्याला अपघात टाळता येत नाही. मात्र तरीही अनेकदा आपल्याला काळजी घेऊन इतरांना त्यातून बाहेर काढण्यास मदत करता येऊ शकते. अशा वेळी पोलीस, अग्निशमन दल यांना तातडीने यासंबंधीची माहिती सुद्धा पण देऊ शकतो. एक सामान्य नागरिक म्हणून आपली ही जबाबदारी आहे.

ठोस उपाययोजनांची आवश्यकता :
आग लागू नये यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाय आणि त्या पद्धतीचे कायदे करण्याची आपल्याकडे फार आवश्यकता आहे. त्यातून आपण अनेक घटना रोखू शकतो. कारण अनेकदा आगीच्या ठिकाणी मालमत्तेचे नुकसान तर होतेच त्याशिवाय अनेकदा मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या सुद्धा फार मोठी असते. त्यामुळे या घटनांकडे गांभीर्याने बघण्याची आवश्यकता आहे आणि त्या पद्धतीने उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. आपणा अनेकदा पाहिले असेल की अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये किंवा आपल्याकडील हॉटेल्समध्ये सुद्धा काही कारणांमुळे धूर झाला तर लगेच अलार्म ऍक्टिव्हेट होतो. त्यामुळे तिकडे संभाव्य धोका निर्माण होत आहे का यासंबंधी सूचना संबंधित प्रशासनास मिळत असते. असे अनमोल मार्गदर्शन वाणी यांनी येथील रहिवाशांना केले.

मला एक्झर्बिया अबोड सोसायटीमध्ये फायरचे मार्गदर्शन करण्याची संधी दिली. त्याबद्दल एक्झर्बिया अबोड गणेशोत्सव मंडळाचा आणि सोबतच सर्व रहिवाशांनी आपला अनमोल वेळ दिला. माझे मार्गदर्शन समजून घेतले त्याबद्दल मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो. आग आटोक्यात आणण्यासाठी आणीबाणी च्या वेळेस आपल्याला कोणती मदत घ्यायची. आणि महिला स्वयंपाक करताना त्यांनी घ्यावयाची काळजी या बद्दल मला मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. खरे तर ही काळाची गरज आहे. त्याची माहिती हि सर्वांना असायला हवी. आग लागल्यास आपण घाबरून न जाता त्याच्या वर लवकरात लवकर मात करता आली पाहिजे. अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी पोलिस, रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दल यांची मदत घेतांना वेगवेगळ्या क्रमांकावर संपर्क करावा लागतो. पोलिसांसाठी 100, रुग्णवाहिकेसाठी 102 तर अग्निशमन सेवेसाठी 101 असे नंबर आहेत.
– धनंजय वाणी, अग्निरोधक प्रशिक्षक, फायर सेफ्टी ऑफिसर तथा एक्झर्बिया अबोड गणेश उत्सव मंडळाचे विद्यमान अध्यक्ष

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button