breaking-newsराष्ट्रिय

काँग्रेसचे वरिष्ठ नेते कर्नाटकात दाखल

बंगळूरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाला काही तास बाकी असताना काँग्रेस-भाजपासह इतर राजकीय पक्षांनी सत्तास्थापनेसाठी आपापली तयारी सुरु केली आहे. काँग्रेसने आकड्यांच्या जुळवाजुळवीकरीता आपल्या दोन वरिष्ठ नेत्यांना कर्नाटकात पाठवले आहे. त्यानुसार अशोक गहलोत आणि गुलाम नबी आझाद हे दोघे कर्नाटकात दाखल झाले आहेत.

गुलाम नबी आझाद यांनी भाजपध्यक्ष अमित शहा यांच्या कर्नाटकात १३० जागा जिंकण्याचे वक्तव्य खोडून काढले आहे. गुजरातमध्ये त्यांनी १५० जागा मिळतील असे म्हटले होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांना किती जागा मिळाल्या असा सवाल त्यांनी केला. गोवा आणि मेघालयात सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतरही काँग्रेस येथे सत्ता स्थापन करु शकली नव्हती. त्यामुळे आयत्यावेळी भाजपाने कर्नाटकात बाजी मारू नये यासाठी काँग्रेसने मागील बाबींवरुन धडा घेऊन आपल्या दोन टॉपच्या रणनितीकारांना कर्नाटकात पाठवले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button