breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

Ashadhi Wari 2023 : संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी सोन्या-खासदार बैलजोडीला मान

पुणे : जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या ३३८ व्या पालखी सोहळ्यातील बैल जोडीचा मान देहू गावातील सुरेश दिगंबर मोरे व पिंपळे सौदागर येथील महेंद्र बाळकृष्ण झिंजुर्डे यांच्या बैल जोडीला मिळाला आहे. चौघड्यासाठी बैल जोडीचा मान चिंबळी तालुका खेड येथील सत्यवान ज्ञानेश्वर जैद यांच्या बैल जोडीला मिळाला असल्याची माहिती जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थानकडून प्रसिद्धी पत्राद्वारे देण्यात आली आहे.

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्र्वर महाराज पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. संत तुकाराम महाराजांच्या ३३८ व्या पालखी सोहळ्याचा पालखी रथ ओढण्याची सेवा करण्याची संधी देहूगाव येथील श्री संत तुकाराम महाराजांच्या वंशजांच्या सुरेश दिगंबर मोरे यांच्या सोन्या व खासदार तर पिंपळे सौदागर येथील महेंद्र बाळकृष्ण झिंजुर्डे यांच्या राजा- सोन्या व चौघडा गाडीला जुंपण्याचा मान चिंबळी येथील सत्यवान जैद यांच्या राजा व सर्जा बैलजोडी मिळाला आहे.

हेही वाचा – ‘आगामी २०२४ ची शिरूर लोकसभा लढवणार अन् जिंकणार’; विलास लांडे यांचे विधान

पालखी रथासाठी १८ बैलजोडी मालकांचे अर्ज

यंदाच्या पालखी सोहळ्यासाठी पालखीचा मुख्य रथ ओढण्यासाठी बैलजोडी मालकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी १८ बैलजोडी मालकांनी अर्ज केले होते. तर सनई-चौघड्याच्या रथासाठी चार बैलजोडी मालकांचे अर्ज संस्थानकडे प्रप्त झाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button