पिंपरी / चिंचवड

किरकोळ कारणावरून एकावर खुनी हल्ला

पिंपरी l प्रतिनिधी

टेम्पो चालकाने टेम्पो एका दुचाकीला आडवा लावला. त्यावरुन बाचाबाची झाल्यानंतर दुचाकीस्वाराने टेम्पो चालकाला समजावून सांगितले. समजावून सांगितल्याचा राग आल्याने टेम्पो चालकाने त्याच्या साथीदारांना बोलावून दुचाकीस्वाराला बेदम मारहाण करत त्याच्यावर खुनी हल्ला केला. ही घटना मंगळवारी (दि. 14) सकाळी अकरा ते साडेअकरा वाजताच्या कालावधीत चिंबळी फाटा येथे घडली.

विवेक विनायक कुमटकर (वय 37, रा. मोशी) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. 15) आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजिंक्य नेमिनाथ जैद (वय 24), विक्रम लक्ष्मण जैद (वय 39, दोघे रा. चिंबळी, ता. खेड), अक्षय बबन बनसोडे (वय 23, रा. पाथर्डी फाटा, नाशिक), टेम्पो चालक अक्षय बनसोडे आणि त्यांचे दोन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या पत्नी आणि मुलाला पत्नीला मेडिकलवर सोडण्यासाठी जात होते. चिंबळी फाट्याजवळ आरोपी टेम्पो चालक अक्षय बनसोडे याने टेम्पो जोरात चालवून फिर्यादी यांच्या दुचाकीला आडवा लावला. त्यामुळे फिर्यादी आणि टेम्पो चालकामध्ये बाचाबाची झाली. त्यांनतर फिर्यादी यांनी टेम्पो चालकाला समजावून सांगितले.

समजावून सांगितल्याचा राग आल्याने टेम्पो चालकाने त्याच्या साथीदारांना बोलावले. फिर्यादी यांची गाडी आडवून त्यांना शिवीगाळ केली. फिर्यादी यांना गाडीवरून खाली ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. गळा आवळून जीवे मारण्याच्या उद्देहसाने त्यांचे डोके गाडीवर आणि भिंतीवर जोरात आदळले. त्यांनतर गाडीवर ढकलून टणक वस्तूने फिर्यादी यांच्या गळ्याजवळ मारून दुखापत केली. पोलिसांनी अजिंक्य, विक्रम आणि अक्षय या तिघांना अटक केली आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button