breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

हिंजवडी ग्रामपंचायतीचा पिंपरी पालिकेला कच-याचा “आहेर”

  • भाजप नगरसेवक विजय उर्फ शीतल शिंदे यांनी केला भांडाफोड
  • मध्यरात्री भररस्त्यात पकडला टेम्पो

पिंपरी (महा ई न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीलगत असलेल्या हिंजवडी ग्रामपंचायतीने आपल्या हद्दीतील ओला-सुका दुर्गंधीयुक्त मिश्रीत कचरा महापालिकेच्या हद्दीत ठेवलेल्या कचार कुंड्यांमध्ये टाकला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट होण्यासाठी तिव्र विरोध दर्षविणा-या हिंजवडी ग्रामपंचायतीने स्वतःवर नामुष्की ओढवून घेत निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे. रात्री टेम्पो भरून कचरा खाली करत असताना चिंचवडमधील भाजपचे नगरसेवक विजय उर्फ शीतल शिंदे यांनी दखल घेतल्यामुळे हा प्रकार उजेडात आला आहे.

 

औद्योगिक दृष्ट्या पिंपरी-चिंचवडचा विस्तार करण्यासाठी आयटी पार्कचा परिसर असलेल्या हिंजवडी ग्रामपंचायतीला पिंपरी-चिंचवड महापालिकेत सामावून घेण्याचे प्रस्तावित आहे. त्याला हिंजवडी ग्रामपंचायतीने तिव्र विरोध दर्शविला आहे. परंतु, हिंजवडीतील आयटी पार्कमध्ये काम करणारा मोठा वर्ग पिंपरी-चिंचवडमधील वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळ निलख, रहाटणी, चिंचवड परिसरात राहतो. याठिकाणाहून हिंजवडीत जाण्यासाठी या ग्रामपंचायतीने मोठे रस्ते केलेले नाहीत. दळणवळण व्यवस्था कुचकामी असल्यामुळे या कामगारांचे अतोनात हाल होतात. त्यांचा समाविष्ठ होण्याला विरोध असताना सुध्दा पिंपरी-चिंचवड महापालिकेने हिंजवडीसाठी वाकडमध्ये उड्डाणपूल तयार केला. डांगे चौकातील रस्ता तयार केला. त्यामुळे हजारो वाहनांच्या रांगा लागून तासनतास होणारी वाहतूक कोंडी अटोक्यात आणली.

 

तरीही, या ग्रामपंचायतीने महापालिकेशी गैरव्यवहार केला आहे. त्यांच्या हद्दीतील घाण दुर्गंधीयुक्त कचरा टेम्पो भरून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील कचरा कुंड्यांमध्ये खाली केला आहे. रात्री हा प्रकार होत असताना चिंचवडचे नगरसेवक शीतल शिंदे यांनी याची दखल घेऊन कचरा टाकणारा टेम्पोचालक व कामगारांशी विचारपूस केली. त्यांनी ग्रामपंचायतीचा कचरा असल्याचे सांगितले. यावर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button