breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

किरीट सोमय्यांनी राजभवनाला लिहिलेलं पत्र आलं समोर; चर्चगेट स्टेशनवर पैसे जमा केले, पण….

मुंबई |

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ‘सेव्ह विक्रांत’ मोहीमेतंर्गत जमा झालेले पैसे हडपल्याच्या आरोपाची सध्या प्रचंड चर्चा सुरु आहे. अशातच आता किरीट सोमय्या यांनी २०१३ साली राजभवनाला लिहलेले पत्र समोर आले आहे. ‘टीव्ही ९ मराठी’ने हे पत्र समोर आणले आहे. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी तत्कालीन राज्यपाल के. शंकरनारायणन यांना हे पत्र लिहले होते. या पत्रात ‘सेव्ह विक्रांत’ मोहिमेतंर्गत चर्चगेट स्थानकावर ११,२२४ रुपये जमा झाल्याचे नमदू करण्यात आले आहे. हे पैसे मी आपणास सुपूर्द करू इच्छितो, असेही सोमय्या यांनी पत्रात म्हटले आहे.

त्यामुळे किरीट सोमय्या यांनी हे पैसे तोपर्यंत तरी राजभवनात दिले नव्हते, हे वरकरणी दिसत आहे. त्यामुळे कुठेतरी संजय राऊत यांच्या दाव्याला बळ मिळताना दिसत आहे. तसेच किरीट सोमय्या यांनी पत्रात नमूद केलेले पैसे हा फक्त चर्चगेट स्थानकावरील एका दिवसाचा निधी आहे. परंतु, संजय राऊत यांच्या दाव्यानुसार ‘सेव्ह विक्रांत’ मोहिमेतंर्गत जवळपास १० दिवस विविध रेल्वे स्थानकांवर पैसे जमा करण्यात आले होते. चर्चगेट ते अंबरनाथ अशा सर्व रेल्वे स्थानकांवर हे पैसे गोळा करण्यात आल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यामुळे आता यावर किरीट सोमय्या काही स्पष्टीकरण देणार का, हे पाहावे लागेल.
  • किरीट सोमय्यांच्या पत्रात नेमकं काय म्हटलंय?
विक्रांत युद्धनौकेशी जनभावना जोडली गेलेली आहे. विक्रांत युद्धनौकेचे स्मारकात रुपांतर करण्याचे राज्य सरकारने मान्य केले होते. परंतु, आता राज्य सरकारने माघार घेऊन ‘विक्रांत’ला बुडवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडे निधी नाही, असे सांगितले जात आहे. त्यामुळेच जनभावना कळवण्यासाठी जनतेतून निधी गोळा करण्याचा उपक्रम आज आम्ही चर्चगेट रेल्वे स्थानकात राबवला. त्यामधून ११,२२४ रुपये जमा झाले. हा निधी आपणास सुपूर्द करू इच्छितो. महाराष्ट्राची जनता निधी कमी पडून देणार नाही. विक्रांत वाचवण्यासाठी आपण राज्य सरकारला आग्रह करावा, ही विनंती.आपला
डॉ. किरीट सोमय्या

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button