पिंपरी / चिंचवड

पिंपरीतील शिव मंदिराजवळ गांजा ओढणा-या तरुणाला अटक

पिंपरी l प्रतिनिधी

अशोकनगर, पिंपरी येथील शिव मंदिराजाच्या बाजूला बसून गांजा ओढत असलेल्या एका तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 10) दुपारी दोन वाजता करण्यात आली.

विजय गोविंद तांबवडे (वय 22, रा. दिघी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक अजित कुटे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विजय हा अशोकनगर येथील शिव मंदिर आणि दुर्गामाता मंदिराच्या बाजूला असलेल्या वडाच्या झाडाखाली गांजा ओढत बसला असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून कारवाई करत विजय याला ताब्यात घेतले. त्याची  झडती घेतली असता त्याच्याकडे 160 रुपयांचा सहा ग्राम गांजा आणि गांजा ओढण्याचे साहित्य मिळाले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button