breaking-newsराष्ट्रिय

कोरोना काळात रेल्वेत नोकरीची संधी

नवी दिल्ली : कोरोना काळात सरकारी नोकरीची संधी उपलब्ध आहे. भारतीय रेल्वेत यासाठी भरती सुरु आहे. रेल्वेत तब्बल 1.40 लाख जागांसाठी भरती होणार असल्याची माहिती मिळत आहे. ही भरती सेफ्टी आणि नॉन सेफ्टी डिपार्टमेंटमध्ये असणार आहे. यासाठीची संपूर्ण अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. या भरतीबाबतची संपूर्ण माहिती रेल्वेच्या वेबसाईटवर मिळू शकते.

रेल्वेत नोकरीसाठी सेफ्टी कॅटेगरीमध्ये 72274 पदांसाठी आणि नॉन सेफ्टी कॅटेगरीमध्ये 68366 पदांसाठी भरती असल्याची माहिती आहे. 

याआधी रेल्वे रिक्रूटमेंट सेलने (RRC) ईस्टर्न रेल्वेमध्ये एक्ट अप्रेंटिससाठी ( Act Apprentice) भरती सुरु केली होती. या भरतीसाठी रेल्वेकडून 2792 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. उमेदवार 9 जुलै 2020 पर्यंत या भरतीसाठी अर्ज करु शकतात.

रेल्वेने या भरतीसाठी पुन्हा एकदा अर्ज करण्याची संधी दिली आहे. ऍप्लिकेशन फॉर्म रिओपन करण्यात आले आहेत. या पदांवर नोकरीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. मेरिटच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला इयत्ता 10वीमध्ये कमीत कमी 50 टक्के मार्क असणं आवश्यक आहे. उमेदवाराकडे एनसीवीटी, एससीवीटीकडून नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्याशिवाय वेल्डर, शीट मेटल वर्कर, लाईनमॅन, वायरमॅन, कारपेंटर, पेंटर या पदांसाठी 8वी उत्तीर्णसह नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. 

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा कमीत कमी 15 ते अधिकाधिक 24 वर्ष इतकी ठेवण्यात आली आहे. वयोमर्यादेमध्ये एससी, एसटीसाठी 5 वर्ष, ओबीटी-एनसीएल उमेदवारासाठी 3 वर्ष आणि पीडब्ल्यूबीडी उमेदवारासाठी 10 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

उमेदवाराची निवड मेरिटनुसार होईल. यात उमेदवारचे 10वी किंवा 8वीचे गुण आणि आयटीआयचे गुणही पाहिले जाणार आहेत. 

या भरतीसाठी अर्ज करताना 100 रुपये फी आहे. तर एससी, एसटी, पीडब्ल्यूबीडी आणि महिला उमेदवारांना पैसे भरावे लागणर नाहीत. उमेदवार नेट बँकिंग, क्रेडिट-डेबिट कार्डद्वारे करु शकतात. या http://apprentice.rrcrecruit.co.in/gen_instructions_er.aspx किंवा या http://www.rrcer.com वेबसाईटवरुन इच्छुक उमेदवार अधिक माहिती घेऊ शकतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button