ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी यांच्याकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अकरा लाख रूपयांचा धनादेश सुपूर्द

इंद्रायणीनगर | कोकण पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक संस्था, संघटनांनी भरभरून मदत केली. अजूनही मदतीचा ओघ सुरुच आहे. श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी यांच्याकडून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सुमारे अकरा लाख रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे सुपूर्द करण्यात आला. मुंबई येथील वर्षा बंगल्यावर देवसंस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन, धनादेश सुपूर्द केला. यावेळी देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्थ पंकज निकुडे, विश्वस्थ उद्योजक तुषार सहाणे, विश्वस्थ अशोक संकपाळ, प्रसाद शिंदे, संदीप जगताप, शिवराज झगडे, देवसंस्थान मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते.

यावेळी देवसंस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यशासनाने “खंडोबा गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत ” गडकोट ,पायरीमार्ग ,दीपमाळा ,वेशी,व मुख्य मंदिर ,डागडुजी दुरुस्ती विकासकामांकरिता भरीव निधीची तरतूद केल्याबद्दल आभार मानले. याबाबत अधिक माहिती देताना, उद्योजक तुषार सहाणे म्हणाले, देवसंस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी पूरग्रस्तांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी यांच्यामार्फत मदत कऱण्याचे नियोजन केले. त्यानुसार मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना भेटून चर्चा करून, धनादेश सुपूर्द केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button