breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाढदिवसानिमित्त पिंपरी युवासेनेकडून आदित्य जनसेवा सप्ताह

पिंपरी / महाईन्यूज

युवासेना प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ह्यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी युवासेनेकडून आदित्य जनसेवा आयोजित केली आहे.

दापोडी येथील सरवस्ती अनाथ आश्रमास दिनांक 7 जुन रोजी अन्नधान्य वाटप करण्यात येईल. दिनांक 8 जुन रोजी रोजी कासारवाडी येथील सफाई कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायजर वाटप करण्यात येईल. दिनांक 9 जुन रोजी यशवंतराव चव्हाण रुग्णालयमध्ये फळे वाटप, दिनांक 10 जून रोजी लांडेवाडी येथील गरीब व मजदूर लोकांना अन्नधान्यचे किट वाटप, दिनांक 11 जून रोजी पिंपळे गुरव येथील अंध आश्रम मध्ये अन्नदानचा कार्यक्रम, दिनांक 12 जुन रोजी वाहतूक पोलीस स्टेशन भोसरी येथे मास्क व सॅनिटायजर वाटप, दिनांक 13 जुन रोजी दापोडी व फुगेवाडीमधील रिक्षा चालकास अन्नधान्य किट वाटप करण्यात येईल. अशा प्रकारे आदित्य जनसेवा सप्ताह राबविण्यात येणार आहे, अशी माहिती पिंपरी विभाग संघटक निलेश हाके ह्यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button