TOP Newsताज्या घडामोडीपुणे

हजरत महमद पैगंबर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांची भव्य अभिवादन मिरवणूक

पुणे : ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ (आझम कॅम्पस) आणि संलग्न संस्थाच्या वतीने रविवार, दिनांक ९ ऑकटोबर रोजी ‘हजरत महमद पैगंबर जयंती’(ईद-ए-मिलाद)निमित्ताने विद्यार्थ्यांच्या अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ८. ३० वाजता संस्थेचे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार यांच्या उपस्थितीत मिरवणुकीला प्रारंभ झाला. हजरत मोहम्मद पैगंबरांचे शैक्षणिक, सामाजिक संदेश, घोषवाक्याचे फलक मिरवणुकीचे आकर्षण ठरले. संस्थेचे सचिव प्रा. इरफान जे. शेख, शाहिद इनामदार, एस. ए. इनामदार, तसेच गोल्डन ज्युबिली एज्युकेशन ट्रस्ट, हाजी गुलाम मोहम्मद आझम एज्युकेशन ट्रस्ट, एमएमईआरसी, डेक्कन मुस्लिम लायब्ररी, अवामी महाज संस्थेचे पदाधिकारी, व आझम कॅम्पस शिक्षण संकुलाचे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मिरवणूक आझम कॅम्पस येथून निघून, डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट, ‘ट्राय लक हॉटेल, गाय कसाब मशीद, बाबाजान दर्गा, सरबतवाला चौक, हुसैनीबाग, क्वार्टर गेट, मॉडर्न बेकरी, इस्लमपुरा, ए. डी. कॅम्प चौक, भारत सिनेमा, पद्मजी पोलीस चौकी, निशांत थिएटर, भगवानदास चाळ, चुडामण तालीम, पूना कॉलेज आणि आझम कॅम्पस गेट येथे मिरवणुकीची सांगता झाली.अभिवादन मिरवणूक उपक्रमाचे हे १८ वे वर्ष होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button