breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महिलांची गर्दी हिच कविताताईंच्या कामाची पावती : आश्विनीताई जगताप

पिंपरी : महिलांसाठी विविध उपक्रम राबविणे, नागरीकांच्या मदतीला धावून जाणे, राजकारणापेक्षा कायम सामाजिक कार्याला प्रथम प्राधान्य देणे आणि सर्वांशी मिळून मिसळून राहणे याच त्यांच्या गुणांमुळे आज असंख्य महिला कविताताई दळवी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असल्याचे सांगत गौरी गणपती सजावट स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद पाहून अश्विनीताई लक्ष्मण जगताप यांनी कविताताई यांच्या करायचे तोंडभरून कौतुक केले.

दळवीनगर, भोईरनगर, इंदिरानगर प्रेमलोक पार्क, गिरीराज गार्डन, बिजलीनगर, शिवनगरी, चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी प्रभाग क्रमांक १७ मधील महिलांसाठी आमदार लक्ष्मण जगताप, शंकरशेठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कविताताई पंढरीनाथ दळवी यांनी भव्य गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन केले होते. नुकताच त्या स्पर्धेचा चिंचवड येथील चैतन्य सभागृहात बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.

यामध्ये पहिल्या, दुसर्या व तिसऱ्या क्रमांकासाठी मायक्रो ओव्हन, मिक्सर, डिनरसेट यांसह स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास उत्तेजनार्थ भेटवस्तू देण्यात आली. गणपती सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक संगीता धीमते, दुसरा क्रमांक रुपाली नल्लां, तृतीय क्रमांक सविता टकले तसेच गौरी सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक राणी आहेर दुसरा क्रमांक सुनीता शिंदे आणि तिसरा क्रमांक सुचिता भालेकर यांना बक्षीस देण्यात आले, तसेच यावेळी २० लकी ड्रॉ काढण्यात आले तर नवरात्रीनिमित्त विविध क्षेत्रातील विशेष ९ नवदुर्गांचा सत्कार करण्यात आला.

मुख्य आयोजक कविताताई दळवी म्हणाल्या, प्रभाग क्रमांक १७ मधील महिलांनी या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यापूर्वी देखील येथील महिलांनी प्रत्येक उपक्रमाला असाच भरघोस प्रतिसाद दिलेला आहे. यापुढेही त्यांचे प्रेम असेच राहील असा विश्वास व्यक्त करत आलेल्या सर्व महिलांचे स्वागत करून आभार मानले.

यावेळी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनीताई जगताप, माजी महापौर उषा माई ढोरे, ऐश्वर्या रेणुसे (जगताप), माजी पक्षनेते नामदेव ढाके, शेखर चिंचवडे, भारत केसरी विजय गावडे, पल्लवी वाल्हेकर, उज्वला गावडे, तात्या आहेर, अमृता नवले, मंदाकिनी आव्हाळे, करुणा चिंचवडे, भारत दळवी, राजेंद्र दळवी, सचिन दळवी, सुनील दळवी, विजय दळवी, संतोष दळवी, अविनाश दळवी, अथर्व दळवी, शैलेश दळवी, संभाजी लोखंडे, संतोष मांदळे, तेजेस खेडेकर, अशोक वाळूज, संगीता नाळे, खंडू कठारे, राहुल कान्हुरकर, देविदास ढमे, किरण गुरुणावर, गजानन गुरुणावर यांच्यासह विवीध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रसिद्ध निवेदक आर जे अक्षय यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार युवा नेते अनिकेत दळवी यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button