breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

अबब… एक झाड करतेय करणी ; गहुंजेमध्ये लिंबुमिर्ची मुक्त झाड

– अंघोळीची गोळी-खिळेमुक्त झाडे अभियानाचा उपक्रम
पिंपरी ( महा ई न्यूज ) – एकीकडे 21 व्या शतकात भारत महासत्तेकडे वाटचाल करत असताना दुसरीकडे अंधश्रध्दा पसरवणा-यांची संख्या वाढू लागली आहे. विज्ञानाच्या प्रगतीने देशात अनेक क्रांती घडून येत आहे. तरीही आजच्या वैज्ञानिक युगात अंधश्रध्दा पाळणा-या संख्या कमी होताना दिसत नाही. विशेषता एका झाडाचा करणी करण्यासाठी वापर होतोय, हे ऐकूण आर्श्चय वाटेल. परंतू, त्या झाडावर अनेकांनी लिंबु, मिर्ची, काळ्या बाहुल्या, टाचण्या बांधून खिळे ठोकले होते. तसेच ज्यांच्या नावाने करणी करायचीय, त्या व्यक्तीच्या नावाने चिठ्या देखील लावल्या जात होत्या. त्यामुळे समाजात अंधश्रध्दा पसरवण्याची संख्या दिवसेंदिवस फोफावली असून अनेक भोंदू बाबांनी धंदा मांडल्याचे यावरुन दिसत आहे.
याबाबत मामुर्डी ते गहूंजे स्टेडियम शेजारी एका झाडाचा करणी करण्याचा वापर करण्यात येत होता. अनेकांनी त्या झाडांवर लिंबु आणि मिंर्ची बांधून खिळे ठोकले होते. याशिवाय करणी करणा-यांच्या नावावर चिठ्या देखील लिहून ठेवल्या होत्या. याविषयी अंघोळीची गोळी खिळेमुक्त झाडे अभियानच्या सदस्यांनी भय इथले संपत नाही, म्हणत ते झाड लिंबु मिर्ची मुक्त केले आहे.
मामुर्डी ते गहूंजे स्टेडियम शेजारी एक्सप्रेस वे  हायवेपासुन शंभर मीटर अंतर एक झाड आहे. त्या झाडावर करणी करण्यासाठी वापर केला जात आहे. लिंबु, काळ्या बाहूल्या, टाचण्या, बिब, सुई, मिर्ची आणि चिठ्या झाडावर खिळे मारुन लावल्या जात आहेत. या झाडाच्या शेजारी अंत्यत उच्चभ्रु सोसायटीत लोक राहत आहेत. त्या लोकांच्या मनात झाडावरील अंधश्रध्देविषयी काहीच माहिती नाही का? तरी त्याकडे अनेकांनी कानाडोळा केला.
या झाडाबाबत अंघोळीची गोळी – खिळेमुक्त झाडे अभियानाच्या सदस्यांना एका जागरूक नागरिकाने ही माहिती दिली. सर्व सदस्यांनी सदरील झाडाची पाहणी करुन तात्काळ हे झाड खिळेमुक्त आणि लिंबू मिर्ची मुक्त केले आहे. या अभियानात अंघोळीची गोळीच्या प्राजक्ता रुद्रवार, केतकी नायडू, गणेश बोरा, ज्ञानेश्वर भंडारे, सचिन खोले, विश्वेश आणि सिद्धेश खोले ही लहान मुले सहभागी झाली होती. यावेळी झाडाचे संवर्धन करा, त्यावर अंधश्रद्धा पसरवू नका, असा संदेश त्यांनी दिला आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button