breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

इंग्लंडमध्ये दुसऱ्या लॉकडाऊनची घोषणा

लंडन – जगभरातील कोरोना संकट दिवसागणिक अधिकाधिक गंभीर होत आहे. युरोप आणि अमेरिकेत कोरोना विषाणूची दुसरी लाट आली आहे. त्यातच थंडीत कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर फ्रान्सनंतर आता इंग्लंडनेही लॉकडाऊनची घोषणा केली आहे. इंग्लंडचे प्रांतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ५ नोव्हेंबर ते २ डिसेंबरदरम्यान इंग्लंडमघ्ये दुसरा लॉकडाऊन जाहीर केला आहे. बोरिस जॉन्सन यांच्या अधिकृत ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत ही माहिती दिली आहे.

या लॉकडाऊन काळात शाळा, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आणि वर्क ऑफ होम करता येणे शक्य नाही अशी कामाची ठिकाणे सुरू राहणार आहेत. तसेच रेस्टोरंट्समधून केवळ टेक-आउट आणि डिलिव्हरी सुविधा सुरू असेल. दरम्यान, लॉकडाऊन काळात घरातच राहण्याची विनंती करण्यात आली असून चार आठवड्यानंतर परिस्थिती पाहून लॉकडाऊन संपवायचा किंवा वाढवायचा हे पाहिले जाईल, असे सांगण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button