Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

भारत – इंग्लंड सामन्यातील ‘त्या’ जाहिरातीवरून कीर्ती आझाद आक्रमक; BCCI कडे चौकशीची मागणी

Kirti Azad On BCCI: भारताचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर पार पडला. या सामन्यादरम्यान दाखवलेल्या एका कथित अडल्ट जाहिरातीवरून, भारताचे माजी क्रिकेटपटू आणि तृणमूल काँग्रेसचे नेते कीर्ती आझाद यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. यासह चौकशीची मागणी केली आहे

कीर्ती आझाद यांच्या मते, लाखो लहान मुलं आपल्या कुटुंबासोबत क्रिकेटचा सामना पाहतात. अशावेळी अडल्ट जाहिराती दाखवणं हा गंभीर विषय आहे. लाईव्ह सामन्यादरम्यान अडल्ट जाहिराती दाखवल्या नाही गेल्या पाहिजे. कारण आपल्या आई – वडिलांसोबत जी लहान मुलं सामना पाहतात त्यांचं वय १६ पेक्षाही कमी असतं. या देशात क्रिकेटला धर्म मानलं जातं.

कीर्ती आझाद यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी लिहिले की, “ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर सुरू असलेला भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना लहान मुलं देखील लाईव्ह पाहत आहेत. या सामन्यादरम्यान ड्युरेक्सची जाहिरात दाखवली जाते, हे लज्जास्पद नाही का? बीसीसीआयने ही बाब गांभीर्याने घ्यावी.”

हेही वाचा –  पावसाळ्यात ही फळं नक्की खा… पचनक्रिया राहील निरोगी

तेच त्यांनी दारू आणि सिगारेटच्या जाहिरातींचा उल्लेख करत लिहिले की, “दारू आणि सिगारेटच्या जाहिरातींवर बंदी आहे, मग अशा अडल्ट जाहिराती का दाखवल्या जात आहेत? ते पण सामन्यादरम्यान?” कीर्ती आझाद यांच्या मते बोर्डाने या प्रकरणाची चौकशी करायला हवी. गरज पडली तर हा मुद्दा संसदेत उपस्थित केला जाईल असं देखील ते म्हणाले आहेत.

ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी-२० सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकांअखेर ७ गडी बाद १९० धावा केल्या. भारतीय संघाकडून इशान किशनने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली. तर अभिषेक शर्माने ४३ धावा केल्या आणि कर्णधार श्रेयस अय्यरने ३७ धावांचे योगदान दिले. इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी १९१ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना हॅरी ब्रुकने ३९ तर टॉम बेंटनने ३९ धावांची खेळी केली. तर जेकब बेथेल शेवटपर्यंत उभा राहिला. त्याने ४६ चेंडूंचा सामना करून नाबाद ७६ धावांची खेळी केली आणि इंग्लंडला हा सामना ४ गडी राखून जिंकून दिला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button