Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“प्रवास टाळा, अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं महाराष्ट्राला आवाहन

Devendra Fadnavis :  मुंबईसह, राज्यभरात पावसाची तुफान हजेरी आहे. मुंबईतल्या सखल भागांमध्ये पाणी साठलं आहे. तर मुंबई पुणे एक्स्प्रेस वे आणि जुना मार्ग हे दोन्हीही वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. राज्यात पावसाचं थैमान पाहण्यास मिळतं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच संदर्भात विधानसभेत निवेदन दिलं आणि आज घराबाहेर पडू नका म्हणत जनतेला महत्त्वाचं आवाहन केलं आहे.

एक अतिशय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे जी आपल्याला निसर्गामुळे पाहण्यास मिळते आहे. या परिस्थितीचं गांभीर्य आहेच. ताशी ५० किमी वारे रविवारी वाहात होते आणि मुंबईत दरवर्षी ८०० झाडं पडतात. प्रत्येक पावसाळ्यात ही सरासरी आहे. रविवारी एका दिवसात ३५० झाडं पडली आहेत. त्यामुळेच आपण वर्क फ्रॉम होमची विनंती केली आहे कारण दुपारनंतर ७० ते ९० किमी ताशी वेगाने वारे वाहणार आहेत. इमारत जी पडली ती घटना दुःखदायक आहे. पण जी इमारत पडली ती बेकायदेशीर होती. ज्या घरावर ती पडली त्यातल्या लोकांचा मृत्यू झाला. मुंबई-पुणे रस्ता बंद झाला आहे. ज्या घटना घडल्या आहेत ते निसर्गाचं चक्र बदलल्याने होत आहेत. महापालिका, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सगळ्यांनी तयार केली होती. पण या अनेक गोष्टी अशा घडत आहेत ज्या विपरीत आहेत. सगळ्या यंत्रणा रस्त्यावर आहेत. विविध घटनांचा सामना करत आहेत.

हेही वाचा –  ITR Refund अडकला? ई-व्हेरिफिकेशन उशिरा झाले तरी मिळणार परतावा; ITAT चा मोठा निर्णय

कनेक्टिंग लिंक पाशी जशी दरड कोसळली तो रस्ता तातडीने बंद करण्यात आला. पुण्यात आणि मुंबईत दोन्ही बाजूने सांगितलं आहे की तुम्ही प्रवास करु नका. अडकलेले लोक फार प्रमाणात नाहीत. पण जे लोक अडकले आहेत त्यांची सुटका करण्याचं काम सुरु आहे. आजचा दिवसही महत्त्वाचा आहे. दोन ते तीन दिवसांमध्ये झालेल्या घटना, त्यावर केलेली कारवाई, या घटना घडू नयेत म्हणून होणारी कारवाई. मी राजकीय निवेदन देऊ शकतो. आजचा दिवस महत्त्वाचा आहे. त्यामुळे मंगळवारी पूर्ण निवेदन देऊ.

आज दुपारनंतर मोठ्या प्रमाणावर वारे वाहणार आहेत. लोकांनी सजग राहण्याची आवश्यकता आहे. जिथे दुर्घटना होऊ शकते अशा ठिकाणी लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे. लोकांनीही सावधगिरी बाळगावी. अत्यावश्यक असल्याशिवाय प्रवास करु नये. आजचा दिवस सगळ्यांनी प्रवास टाळावा. तसंय युवा वर्गाला विनंती करतो की त्यांनी धबधबे, निसर्गरम्य ठिकाणी जाणं टाळावं. सगळ्यांना अलर्ट मोडवर ठेवण्याचं काम आम्ही करतो आहोत असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच दुपारी १२ च्या दरम्यान आढावा बैठक घेतली जाईल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button