Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

केंद्र आणि राज्याच्या धोरणांमुळे सहकार क्षेत्राला नवे बळ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

मुंबई : राज्याने सहकार चळवळीचे मर्म शंभर वर्षांपूर्वीच समजून घेत शेतकऱ्यांना आर्थिक बळ दिले. आजही सहकार हेच ग्रामीण विकासाचे सर्वात प्रभावी साधन आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे सहकार क्षेत्राला नवे बळ मिळत आहे. शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत कर्ज व विकास पोहोचविण्यात सहकारी संस्थांची भूमिका निर्णायक ठरत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आणि सहकारी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सहकार गौरव पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. राज्याने सहकार चळवळीचे मर्म खूप पूर्वी ओळखले होते. सव्वाशे वर्षांपूर्वीपासून सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जाचातून मुक्त करण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्यानंतरच्या काळात सहकारी पतपेढी, बँकिंग, कृषी, डेअरी, गृहनिर्माण, मार्केटिंग अशा विविध क्षेत्रांत सहकारी संस्थांची उभारणी झाली.

पहिली सहकारी पतपेढी १९०४ मध्ये उभी राहिली, १९११ मध्ये शिखर बँकेची स्थापना झाली. धनंजयराव गाडगीळ, विठ्ठलराव विखे-पाटील, वैकुंठभाई मेहता यांसारख्या अग्रणी व्यक्तींनी सहकाराला दिशा दिली. आज राज्यात दोन लाखांहून अधिक सहकारी संस्था कार्यरत आहेत. सहकाराचे सर्वाधिक व्यापक जाळे हे याच राज्यात आहे.सहकार क्षेत्राची खरी ताकद ओळखून ६ जुलै २०२१ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात पहिल्यांदाच स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन केले.

सहकाराला फक्त काही राज्यांपुरती मर्यादित चळवळ म्हणून पाहिले जात होते. सहकाराला राष्ट्रीय स्तरावर धोरणात्मक महत्त्व प्राप्त झाले आहे. दहा हजार कोटी रुपयांचा आयकर माफ करण्याचा निर्णय, इथेनॉल आणि सीबीजी धोरणांमुळे साखर उद्योगाला मिळालेले संजीवनी मिळाली आहे. सहकारी संस्थांना ग्रामीण भागात १७ प्रकारची कामे खुली करून ‘एनसीडीसी’मार्फत अर्थसाहाय्याची सोय केल्याने सहकार संस्था या ग्रामीण परिवर्तनाचे प्रभावी साधन ठरत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हेही वाचा –  मुंबईकरांना सावधान! अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी

सहकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विविध व्यक्ती, संस्था आणि पदाधिकाऱ्यांचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांना ‘सहकार महर्षी पुरस्कार’, वारणा सहकार समूहाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांना ‘सहकार भूषण पुरस्कार’, भगिनी निवेदिता सहकारी बँक, पुणेच्या अध्यक्षा डॉ. रेवती पैठणकर यांना ‘सहकार रत्न पुरस्कार’, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष दिपक पटवर्धन यांना ‘सहकार गौरव पुरस्कार’, अण्णासाहेब सावंत नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षा श्रीमती शोभाताई सावंत यांना ‘महिला सहकार शक्ती पुरस्कार’ तसेच सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे यांना ‘सहकार विभूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उद्योग मंत्री डॉ उदय सामंत, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, सहकार व पुनर्वसन राज्यमंत्री डॉ पंकज भोयर, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button