राज्यात आजही अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा! मुंबईसह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई | राज्यात आज (२९ सप्टेंबर २०२५, सोमवार) अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आजही कायम राहणार असून, काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
अतिमुसळधार पाऊस होणारे जिल्हे:
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड तसेच पुणे घाट परिसर
मुसळधार पाऊस होणारे जिल्हे:
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, सातारा घाट परिसर
हेही वाचा : पालघर जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर
मेघगर्जनेसह पाऊस:
अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर
मुंबई महानगर प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा कार्यरत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी १९१६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.





