Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडी

LPG गॅस ते गुगल पे… येत्या 1 ऑक्टोबरपासून 4 मोठे बदल; काय महाग, काय स्वस्त?

Changes from 1st Oct 2025 : येत्या १ ऑक्टोबर २०२५ पासून तुमच्या खिशावर आणि दैनंदिन व्यवहारांवर थेट परिणाम होणारे चार नियम बदलले जाणार आहेत. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला काही नियम बदलतात. येत्या ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या तारखेपासून हे नियम बदलणार आहेत. यात UPI वापरण्यापासून ते रेल्वे तिकीट बुकिंग करण्यापर्यंत आणि गॅस सिलिंडरच्या दरापासून ते तुमच्या पेन्शनच्या गुंतवणुकीपर्यंतच्या बदलांचा समावेश असणार आहे. त्यामुळे या बदलांची नोंद असणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक असणार आहे.

1.UPI चा नियम बदलणार

सध्या गुगल पे, फोन पे या ॲप्समुळे दैनंदिन व्यवहार करणं खूप सोपे झालं आहे. आता त्या UPI (Google Pay, PhonePe) मध्ये मोठा बदल होणार आहे. ऑनलाईन फसवणूक थांबवण्यासाठी येत्या १ ऑक्टोबरपासून P2P व्यवहार बंद केला जाणार आहे. यामुळे UPI ॲप्सद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला थेट पैसे पाठवण्याची सुविधा बंद होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. हा बदल फक्त सुरक्षेसाठी केला जात आहे.

  1. रेल्वे तिकीट बुकिंगसाठी आधार बंधनकारक

रेल्वेमध्ये होणारे गैरव्यवहार थांबवण्यासाठी आणि दलाली रोखण्यासाठी एक महत्त्वपूर्ण नियम लागू केला जाणार आहे. येत्या १ ऑक्टोबर २०२५ पासून, तत्काळ तिकीट बुकिंगच्या वेळी तिकीट काऊंटर उघडल्यानंतर पहिल्या १५ मिनिटात तिकीट बुकींग करायचे असेल तर तुम्हाला आधार कार्ड IRCTC शी जोडणं बंधनकारक असणार आहे. यामुळे खऱ्या प्रवाशांना तिकीट मिळण्याची शक्यता वाढेल.

हेही वाचा –  खुषखबर ! पुणे, नागपूर मेट्रो जागतिक दर्जाच्या मानकांशी सुसंगत…; या मार्गांवरील मेट्रो प्रवास आणखी सुकर…

  1. पेन्शनच्या गुंतवणुकीत मोठा बदल (NPS)

सरकारी पेन्शन योजना NPS (नॅशनल पेन्शन सिस्टम) मध्ये महत्त्वाचे बदल केले जात आहेत. आता सरकारी नसलेले सदस्य (Non-Government Subscribers) पेन्शनच्या १००% पर्यंत रक्कम शेअर मार्केटमध्ये (इक्विटी) गुंतवू शकतील. आधी ही मर्यादा ७५% होती. यामुळे जास्त फायदा मिळेल. तसेच खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना आता नवीन PRAN खाते उघडण्यासाठी शुल्क भरावे लागणार आहे.

-ई-PRAN किट (E-PRAN Kit): 18 रुपये

-प्रत्यक्ष/भौतिक PRAN कार्ड (Physical PRAN Card): 40 रुपये

-वार्षिक देखभाल शुल्क (Annual Maintenance Charge) प्रति खाते: 100 रुपये

  1. एलपीजी सिलेंडर स्वस्त होणार?

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरच्या दराबद्दलची माहिती समोर येते. त्यातच ऑक्टोबर महिना दिवाळीचा आणि सणासुदीचा असल्याने मोठी कपात होण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात १९ किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली होती. त्यामुळे आता १४ किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कपात केली जाण्याची मोठी शक्यता आहे, ज्यामुळे सामान्य ग्राहकांना दिलासा मिळेल.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button