Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मासुळकर कॉलनी सर्वाधिक तर गवळीनगर, चक्रपाणी वसाहत ठरला सर्वात कमी लोकसंख्येचा मतदार संघ

पिंपरी महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर; ३२ प्रभागांतून निवडले जाणार १२८ नगरसेवक

पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना अखेर (२२ ऑगस्ट) जाहीर करण्यात आली. या प्रारूप रचनेनुसार प्रभाग क्रमांक ९ (मासुळकर कॉलनी, खराळवाडी परिसर) हा सर्वाधिक लोकसंख्येचा असून याठिकाणी ५९,३९० लोकसंख्या आहे. दुसरीकडे प्रभाग क्रमांक ५ (गवळीनगर, चक्रपाणी वसाहत) हा सर्वात कमी लोकसंख्येचा प्रभाग असून येथे ४९,०४९ लोकसंख्या नोंदवली गेली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना अखेर शुक्रवारी (२२ ऑगस्ट) जाहीर करण्यात आली. नव्या रचनेनुसार शहरात एकूण ३२ प्रभाग असून प्रत्येक प्रभागातून चार नगरसेवक निवडले जाणार आहेत. यानुसार एकूण १२८ नगरसेवक महापालिकेत निवडून येणार आहेत.

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, या प्रारूप रचनेवर ४ सप्टेंबर २०२५ पर्यंत नागरिक व इच्छुक उमेदवारांकडून हरकती व सूचना मागवण्यात येणार आहेत. यानंतर ५ ते १२ सप्टेंबर दरम्यान सुनावणी होणार आहे. त्यानंतर सुधारित रचना १३ ते १५ सप्टेंबर दरम्यान नगरविकास विभागाकडे सादर केली जाईल. अंतिम मंजुरीनंतर महापालिका आयुक्तांकडून अंतिम प्रभाग रचना घोषित केली जाईल.

हेही वाचा       :        कराटेपटू भजेश सवरे याला १७ वर्षांखालील जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक

तळवडे-चिखली भागातून प्रभाग रचना सुरू

महापालिकेच्या २०१७ मधील निवडणुकीप्रमाणेच यंदाही चार सदस्यीय प्रभाग पद्धत कायम ठेवण्यात आली आहे. २०११ च्या जनगणनेतील १७,२७,६९२ लोकसंख्या या आधारे प्रभाग रचना करण्यात आली आहे. यावेळी तळवडे-चिखली भागातून प्रभाग रचना सुरू करण्यात आली असून सांगवी-दापोडी भागापर्यंत उतरत्या क्रमाने प्रभाग आखण्यात आले आहेत. गुगल अर्थ मॅपचा वापर करून आणि स्थळ पाहणी करूनच अंतिम नकाशे तयार करण्यात आले.

१ जुलै २०२५ पर्यंतची राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेली मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. त्यानुसार सध्या शहरात १७ लाख ७५१ मतदार आहेत.

– अविनाश शिंदे, सहायक आयुक्त.

आरक्षणानुसार जागा

महिला व पुरुष प्रत्येकी- ६४ जागा
अनुसूचित जाती (SC) – २० जागा
अनुसूचित जमाती (ST) –३ जागा
इतर मागासवर्गीय (OBC) – ३५ जागा
खुला प्रवर्ग – ७० जागा
राखीव असणार आहेत.

या रचनेची नकाशे महापालिका मुख्यालय, क्षेत्रीय कार्यालये व महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

– शेखर सिंह, आयुक्त

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button