Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘मी ससूमधून पळालो नाही, मला पळवलं गेलं’; ललित पाटीलचा गौप्यस्फोट

मुंबई : ड्रग्जमाफिया ललित पाटीलला तामिळनाडू येथून अटक करण्यात आली आहे. ससून रूग्णालयातून ललित पाटील हा आरोपी २ ऑक्टोंबर रोजी पळून गेला होता. त्या घटनेला १५ दिवसांचा कालावधी होऊन देखील आरोपीचा पोलीस शोध लागत नव्हता. अखेर पोलिसांच्या गुन्हे शाखेने तामिळनाडूतील चेन्नई येथून ललित पाटील याला अटक केली आहे. आज त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रूग्णालयात नेले जात असताना मोठा गौप्यस्फोट केला आहे.

ललित पाटील म्हणाले, मी लवकरच पत्रकारांशी बोलणार आहे. मी ससूनमधून पळून गेलो नाही. मला पळवलं गेलंय. मला पळवण्यामागे कोणा-कोणाचा हात आहे हे लवकरच सांगणार आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे.

हेही वाचा – Israel-Hamas : गाझातील रूग्णालयात भीषण स्फोट, ५०० जणांचा मृत्यू 

२ ऑक्टोबर रोजी ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेला. तेव्हापासून तो पोलिसांच्या रडारवर होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांचं गुन्हे शाखा पथक त्याच्या मागावर होते. ललित पाटील चेन्नईत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, त्यांनी चेन्नईतून ललितला अटक केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button