पश्चिम आशियात पुन्हा युद्धाचा भडका! इराण-इस्रायलमध्ये ‘युद्धविराम’ मोडला; क्षेपणास्त्र हल्ल्यांनी इस्रायल हादरले

Iran Israel War | अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात पुकारलेल्या युद्धाला ८ एप्रिल रोजी विराम देण्यात आला होता. मात्र, बरोबर दोन महिन्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडाला आहे. इराणने रविवारी रात्री उत्तर इस्रायलच्या काही भागांना लक्ष्य करत थेट बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा (Ballistic Missiles) मारा केला. या हल्ल्यानंतर इस्रायलनेही तातडीने प्रत्युत्तराखल प्रतिहल्ले सुरू केल्याने पश्चिम आशियात पुन्हा एकदा प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.
इराणच्या या अचानक झालेल्या हल्ल्यानंतर उत्तर इस्रायलमधील अनेक भागांत धोक्याचे सायरन वाजले. प्रशासनाने नागरिकांना त्वरित सुरक्षित स्थळी जाण्याच्या चेतावणी दिल्या. इस्रायली लष्कराने (IDF) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (ट्विटर) वर अधिकृत निवेदन जारी करून या हल्ल्याची पुष्टी केली आहे.
लष्कराने म्हटले आहे की, “इराणकडून इस्रायलच्या दिशेने डागलेली क्षेपणास्त्रे आमच्या रडार यंत्रणेने वेळेतच शोधून काढली. धोका ओळखताच आमची हवाई संरक्षण यंत्रणा (Air Defence System) सक्रिय करण्यात आली. हवाई दलाने इराणकडून आलेली सर्व क्षेपणास्त्रे इस्रायली हद्दीत प्रवेश करण्यापूर्वीच हवेत नष्ट केली आहेत.” सुदैवाने, या हल्ल्यात अद्याप कोणत्याही जीवितहानीचे किंवा मालमत्तेच्या मोठ्या नुकसानीचे वृत्त नाही.
हेही वाचा
‘स्फोटके नियम २००८’ मध्ये सुधारणेसाठी केंद्राला प्रस्ताव सादर करणार
डोनाल्ड ट्रम्प यांचे नेतन्याहू यांना चर्चेचे निर्देश
एकीकडे दोन्ही देशांमध्ये थेट लष्करी कारवाई सुरू असताना, दुसरीकडे अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. ट्रम्प यांनी ‘फॉक्स न्यूज’ आणि ‘एक्सिओस’ या वृत्तवाहिन्यांशी बोलताना सांगितले की, त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी थेट चर्चा केली आहे.
ट्रम्प यांनी नेतन्याहू यांना इराणविरुद्ध कोणतीही सूडबुद्धीची किंवा मोठी लष्करी कारवाई न करण्याचे आणि पुन्हा एकदा चर्चेच्या टेबलावर येण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, ट्रम्प यांची ही शांततेची भूमिका आणि इस्रायली लष्कराकडून प्रत्यक्ष मैदानावर सुरू असलेले प्रतिहल्ले, यात मोठी विसंगती पाहायला मिळत आहे. इराणकडून आणखी क्षेपणास्त्रे डागण्याची शक्यता असल्याने संपूर्ण परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे.





