मी पाकिस्तानी सैन्याचा विश्वासू एजंट..; २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाची धक्कादायक कबुली

Tahawwur Rana | २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार तहव्वूर हुसेन राणाने मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या चौकशीदरम्यान धक्कादायक खुलासे केले आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) ताब्यात असताना राणाने कबूल केले की, तो पाकिस्तानी सैन्याचा विश्वासू एजंट होता आणि खलीज युद्धादरम्यान त्याला सौदी अरेबियात पाठवण्यात आले होते. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, राणाने मुंबई हल्ल्याच्या नियोजनात आपली महत्त्वाची भूमिका असल्याचेही मान्य केले आहे.
दिल्लीतील तिहार तुरुंगात एनआयएच्या ताब्यात असलेल्या तहव्वूर राणाने तपास यंत्रणांना चौकशीदरम्यान अनेक खुलासे केले असल्याचं सांगितलं जात आहे. तहव्वूर राणाने असंही सांगितलं की, तो आणि त्याचा सहकारी डेव्हिड कोलमन हेडलीने पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाबरोबर अनेक प्रशिक्षण सत्रे घेतली होती. तसेच लष्कर-ए-तोयबा प्रामुख्याने गुप्तहेर नेटवर्क म्हणून काम करतं. मुंबईत त्याच्या फर्मचं इमिग्रेशन सेंटर उघडण्याची कल्पना देखील त्याचीच होती आणि २६/११ च्या हल्ल्यादरम्यान तो दहशतवाद्यांच्या योजनेचा एक भाग होता, असंही त्याने कबूल केलं आहे.
हेही वाचा : पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न, एकाला अटक





