ताज्या घडामोडीविदर्भ विभाग

पंढरपूर यात्रेसाठी गेलेल्या तरुणाचा चंद्रभागेत बुडून दुर्दैवी अंत

सकाळी सातच्या सुमारास घटना घडली

बेळगाव : पंढरपूर यात्रेसाठी गेलेल्या बेळगाव तालुक्यातील अलतगा गावातील तरुणाचा चंद्रभागेत बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास घडली. शुभम ज्ञानेश्‍वर पावले (वय २७, रा. तानाजी गल्ली, अलतगा, जि. बेळगाव) असे त्याचे नाव आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अलतगा परिसरातील पाच ते सहा भाविक पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी गेले होते. त्यांच्यासोबत शुभम पावले हाही गेला होता. दरम्यान, शुक्रवारी सकाळी श्री पुंडलिक मंदिराजवळील चंद्रभागा नदीत स्नानासाठी शुभमसह काही भाविक उतरले. मात्र, पाण्याची खोली आणि प्रवाहाची तीव्रता याचा अंदाज न आल्याने शुभम पाण्यात बुडाला.

हेही वाचा –  कुदळवाडीतील नागरिकांनी घेतला योग साधनेचा अनुभव

सहकाऱ्यांनी आरडाओरडा केल्यानंतर प्रशासन आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सलग चार तास राबविलेल्या शोध मोहिमेनंतर शुभम याचा मृतदेह नदीबाहेर काढण्यात यश आले. इतर मित्र वेळेवर पाण्याबाहेर येण्यात यशस्वी ठरले. मात्र, शुभम याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे शुभमच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. रात्री उशिरा शुभम याचा मृतदेह पंढरपूरहून बेळगावकडे नेण्यात आला. स्थानिक प्रशासनाने भाविकांनी नदीत उतरतानाची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

चार तास शोधमोहीम…
सकाळी सात वाजता चंद्रभागेत अंघोळीला उतरल्यानंतर पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो प्रवाहातून वाहून गेला. चार तास शोध मोहीम राबवून शुभमचा मृतदेह नदीबाहेर काढण्यात आला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button