Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

महिला दिनाच्या निमित्ताने महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बाईक रॅली

पुणे : महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या परिमंडळ एक मधील महिला पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी  शुक्रवारी (दि. ७) बाईक रॅलीचे आयोजन केले होते. शनिवारवाडा येथून सुरुवात होऊन बालगंधर्व चौक येथे या बाईक रॅलीचा समारोप झाला.

‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’ तसेच जागतिक महिला दिनाच्या (८ मार्च) पार्श्वभूमीवर शहर पोलिसांच्या परिमंडळ एकच्या कार्यक्षेत्रात ७ ते १० मार्च दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार शुक्रवारी  महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

या बाईक रॅलीची शनिवारवाडा येथून सुरूवात झाली. पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल्ल यांच्या उपस्थितीत रॅलीची सुरुवात झाली. शिवाजी रस्यावरील बुधवार चौक, बेलबाग चौक, उजवीकडे वळून लक्ष्मी रस्त्यावरील सेवासदन, अलका टॉकीज चौक,  खंडोजी बाबा चौक, गुडलक चौक, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता,  मॉर्डन महाविद्यालयासमोरून येऊन बालगंधर्व चौक येथे रॅलीचा समारोप झाला.

हेही वाचा –  पुण्यात भरचौकात तरुणाचे अश्लील चाळे; वडिलांची पहिली प्रतिक्रिया आली समोर, काय म्हणाले वाचा !

बाईक रॅलीच्या समारोप कार्यक्रमाला पोलीस आयुक्त अमितेश कुमार उपस्थितीत होते. बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेले महिला अधिकारी व अंमलदार यांचा पोलीस आयुक्तांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या बाईक रॅलीमध्ये महिला अधिकारी सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार, गिरीषा निंबाळकर,  पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार यांच्यासह ३० ते ४० दुचाकी मोटार सायकलवर ४ पोलीस निरीक्षक, ६ महिला सहायक निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक व ६० महिला अंमलदार सहभागी झाल्या होत्या. बाईक रॅलीमध्ये महिला अधिकारी व अंमलदार यांच्याकडून ‘बेटी बचाओ व बेटी पढाओ’ पोस्टर दाखवुन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

या बाईक रॅलीचे आयोजन अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल्ल तसेच सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार, गिरीषा निंबाळकर,  पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार यांनी केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button