Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

आळंदीत माऊलींच्या मंदिरात श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरी

आळंदी : आळंदी शहरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. राम मंदिर व माऊलींच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

श्री राम जन्मोत्सव निमित्त माऊलीं मंदिरात सकाळी 10 ते दु.12 या वेळेत ह भ प संतोष मोझे यांच्या वतीने ह भ प शरद महाराज बंड यांचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीराम जन्मोत्सव सोहळ्या निमित्त हजारो भाविकांनी सुश्राव्य कीर्तनाचा लाभ घेतला.

हेही वाचा –  नारायण राणेंचं शिर्डीमधून शिवसेना ठाकरे गटाबाबत मोठं भाकीत, म्हणाले पुढच्या निवडणुकीपर्यंत…

श्री राम जन्मोत्सव वेळी हजारो भाविकांनी पुष्पवृष्टी केली.आज श्री रामनवमी निमित्त दुपारी 2:30 ते 6 या वेळेत माऊलीं मंदिरात श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी वर शिंदे शाही पगडी चे चंदन उटीचे रूप साकारण्यात येणार आहे.

श्री राम प्रभू यांच्या पालखीची पूजा व आरती सायंकाळी 5 ते 6 यावेळेस संपन्न होणार आहे. तसेच आळंदीतील श्रीराम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button