‘रॉयल’तर्फे दिवाळीनिमित्त निगडी येथे दिवाळी प्रदर्शन व विक्री
पिंपरी-चिंचवडमधील पाटीदार भवनामध्ये १९ व २० ऑक्टोबर पर्यंत आयोजन

पिंपरी : लायन्स क्लब ऑफ चिंचवड रॉयल तर्फे दिवाळीसाठी उपयुक्त पणत्या, रांगोळी, डिज़ाइनर वस्तू, ज्वेलरी, आकाशकंदील आधी वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे या प्रदर्शनाचे आयोजन 19 व 20 ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. विशेष म्हणजे महिलांनी महिलांसाठी केलेला एक सामाजिक उपक्रम म्हणून प्रदर्शनाची ओळख निर्माण झाली आहे.
“रॉयल दिवाळी मेळा 2024” हा उपक्रम लायन्स क्लब ऑफ चिंचवड रॉयल यांच्या माध्यमातून राबवला जात आहे. या प्रदर्शनाचे हे सातवे वर्ष आहे. घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलांना या प्रदर्शनामुळे व्यासपीठ मिळाले आहे. या प्रदर्शनातून जमा झालेली देणगी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी वापरली जाते. हा महिलांनी महिलांसाठी केलेला एक सामाजिक उपक्रम आहे.
हेही वाचा – पुढील ३ दिवस धोक्याचे! हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी

निगडी प्राधिकरण येथील पाटीदार भवन विक्री व प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचे कपडे, साड्या, बेडशीट तसेच दिवाळीसाठी उपयुक्त पणत्या, रांगोळी, डिज़ाइनर वस्तू, ज्वेलरी, आकाशकंदील विक्रीसाठी उपलब्ध असेल. याशिवाय विविध प्रकारचे फ़ूड स्टॉल्स देखील येथे उपलब्ध असणार आहेत. सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत नागरिक या प्रदर्शनाला भेट देऊ शकतात मागील वर्षी 3 हजाराहून अधिक नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली होती असे आयोजकांत तर्फे सांगण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन विजय सारडा, रिजन चेअरमन लायन शैलजा सांगळे , झोन चेअरमन लायन अनिल बांगडिया यांच्याहस्ते होणार आहे, अशी माहिती लायन्स क्लब चिंचवड रॉयलचे अध्यक्ष ओंकार पटवर्धन यांनी दिली.





