Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘हिम्मत असेल तर मनसेच्या..’; राज्यातील सत्तानाट्यानंतर वसंत मोरेंची मोठी मागणी

मुंबई : अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या ९ आमदारांच्या अपात्रतेची कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वंसत मोरे यांनी मोठी मागणी केली आहे.

वसंत मोरे म्हणाले की, २०१९ ते २०२३ या ४ वर्षात झालेल्या राजकीय खेळात, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, अजित पवार ३ वेळा उपुख्यमंत्री आणि १ वेळा विरोधीपक्षनेता, देवेंद्र फडणवीस १ वेळ मुख्यमंत्री, १ वेळ विरोधी पक्षनेता, १ वेळ उपुख्यमंत्री आणि आता थोड्याच दिवसात कदाचीत पुन्हा मुख्यमंत्री. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि जितेंद्र आव्हाड विरोधी पक्षनेता. आरे म्हणजे तुम्ही काय महाराष्ट्राची सत्ता आपापसात वाटून घेताय का? सत्ताधारी तुम्हीच आणि विरोधी पक्षात पण तुम्हीच…हिम्मत असेल तर मनसेच्या या विधानसभेतील वाघाला किमान एकदा विरोधी पक्षनेता तरी करा मग तुम्हाला कळेल विरोधी पक्षनेत्याची दहशत काय असते…आमचं आपलं बरं आहे बाबा छोटे कुटुंब सुखी कुटुंब, अशी मागणी वसंत मोरे यांनी केली आहे.

हेही वाचा – ‘अजितदादांसह ९ बंडखोरांना अपात्र करण्याची प्रक्रिया सुरू’; जंयत पाटील

दरम्यान, अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमधील ९ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. तसेच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर इतर ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा अत्राम, आदिती तटकरे, अनिल पाटील आणि संजय बनसोडे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button