breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

अंबरनाथमील भीषण आगीत एलको पेंट आणि बॉम्बे हायजीन नावाच्या २ कंपन्या जळून राख

मुंबई : अंबरनाथ पूर्वेत बुधवारी मध्यरात्री २ कंपन्यांना भीषण आग लागली. या आगीत दोन्ही कंपन्या जळून खाक झाल्या असून ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजलेले नाही. अंबरनाथच्या पालेगाव परिसरात आनंद सागर रिसॉर्टच्या मागच्या बाजूला एलको पेंट आणि बॉम्बे हायजीन नावाच्या कंपन्या आहेत. यापैकी एलको पेंट कंपनीत ऑइल पेंट, तर बॉम्बे हायजीन कंपनीत स्वच्छतेचं साहित्य तयार केलं जातं. दरम्यान, बुधवारी रात्री १२ च्या सुमारास या दोन्ही कंपन्यांना मोठी आग लागली होती.

दोन्ही कंपन्या आगीत जळून खाक

यावेळी कंपनीत असलेल्या ड्रमचे मोठमोठे स्फोट होऊ लागले. या आगीची माहिती मिळताच अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर यासह अंबरनाथ एमआयडीसी अग्निशमन दलाच्या ७ गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर ३ तासांनी नियंत्रण मिळवलं. या आगीत कुणालाही इजा झालेली नसली तरी दोन्ही कंपन्या आगीत जळून खाक झाल्या आहेत. तर ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजलेले नाही.

गोदामांमध्ये असलेल्या ज्वलनशील पदार्थांमुळे आग भडकली

रात्रीची वेळ असल्याने आणि गोदामामध्ये कुणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दलाचे यशवंत नलावडे यांनी दिली आहे. गोदामांमध्ये असलेल्या ज्वलनशील पदार्थांमुळे आग भडकत होती. त्यामुळे आग विझवण्यात वेळ गेला. मात्र, या दोन्ही कंपन्या आगीत भस्मसात झाल्या असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

मानखुर्देत भंगार गोदामांना भीषण आग

दरम्यान, दुसऱ्या घटनेत मानखुर्द, मंडाला भागात गुरूवारी सकाळी दहाच्या सुमारास भंगार गोदामांना भीषण आग लागून त्यामध्ये ८ ते १० गोदामे जळून खाक झाली. आगीत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, गोदामे व त्यातील साधनसामग्री जळाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मानखुर्द, मंडाला येथील भंगार गोदामांना, झोपड्यांना आगी लागण्याच्या घटना अधूनमधून घडत असतात. गुरुवारी सकाळी २० फिट रोड, मातंग नगर येथील झोपडपट्टीत आग लागल्याची घटना घडली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button