breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

100 दिवसांत 10 कोटी नागरिकांना कोरोना लस देणार-ज्यो बायडन

वॉशिंग्टन – जगभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येने तब्बल सहा कोटींचा आकडा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे. आता अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडन यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्या 100 दिवसांत 10 कोटी अमेरिकेच्या नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येईल, अशी महत्त्वाकांक्षी घोषणा केली आहे. तसेच मास्क वापरणे सर्वांसाठी अनिवार्य करण्यात येईल व बहुतांश शाळा पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

वाचा :-भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 97,67,372 वर

‘फायझर व मॉडर्ना यांच्याशी यापूर्वी झालेल्या चर्चेनुसार ट्रम्प प्रशासनाने लसींची खरेदी करण्यास सुरुवात करावी. तसेच अमेरिकी नागरिक व जगभरातील देशांना या लसी पुरवण्यासाठी आवश्यक उत्पादन करण्याचेही या कंपन्यांना सूचित करावे. या प्रकारे कार्यवाही झाल्यास माझ्या कार्यकाळाच्या पहिल्या 100 दिवसांत 10 कोटी अमेरिकी नागरिकांना कोरोनाची लस देणे शक्य होईल’, असे बायडन यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर ‘आपण एक आपत्ती निवारण तज्ज्ञांचे पथक नियुक्त केले असून यातील तज्ज्ञ अमेरिकेला आर्थिक संकटातून बाहेर काढतील, तसेच आरोग्यसेवा उंचावण्याचा प्रयत्न करतील’, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, अमेरिकेत एका दिवसात तब्बल दोन लाख नवे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. अमेरिका, भारत आणि ब्राझील या तीन देशांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग असून येथील रुग्णांची संख्या ही सर्वात जास्त आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button