breaking-newsपिंपरी / चिंचवड

दत्ता साने मृत्यूप्रकरणी आदित्य बिर्ला रुग्णालयाची चौकशी करावी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचा मृत्यू कोरोना विषाणुचा संसर्ग होऊन झाला आहे. तथापि, आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या उपचार पध्दतीवर संशय निर्माण झाला आहे. तरी, दत्ता साने यांच्या मृत्यूप्रकरणी आदित्य बिर्ला रुग्णालयाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय मानव अधिकार एवं भ्रष्टाचार निवारण संघटनेने केली आहे.

यासंदर्भात राष्ट्रीय मानव अधिकार एवं भ्रष्टाचार निवारण संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रमेश गणगे यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, दिवंगत दत्ता साने यांच्या कोरोना संबंधीत ज्या टेस्ट करण्यात आल्या, त्या कोणत्या लॅबमध्ये करण्यात आल्या. त्यांच्यावर आदित्य बिर्ला रुग्णालयात दाखल झाल्यापासून ते डिस्चार्ज होईपर्यंत कोणते उपचार केले. याची चौकशी करण्यात यावी, कारण त्यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचे गणगे यांनी म्हटले आहे.

महापालिकेचे विरोधी पक्षनेते असताना दत्ता साने यांनी महापालिकेशी निगडीत भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली होती. नागरिकांच्या पैशांची लूट करणा-या प्रशासनाला जाग्यावर आणण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने केली होती. सत्ताधारी आणि प्रशासन हातात हात घालून नागरिकांच्या पैशांची लूट करत असताना साने यांनी याच्या विरोधात आवाज उठविला आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्युप्रकरणी आदित्य बिर्ला रुग्णालयाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अध्यक्ष गणगे यांनी केली आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन देणार असल्याचेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. उपाध्यक्ष यशवंत कुंभार, युवा अध्यक्ष बाळासाहेब मदने, बळीराजा संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष अनिकेत भोसले यांचे शिष्ठमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार असल्याचे गणगे यांनी सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button