breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडीराष्ट्रिय

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! नवीन सीमसाठी कागदपत्रांची गरज नाही

नवी दिल्ली – नवीन मोबाईल कार्डसाठी आता ग्राहकांना कागदपत्रे देण्याची गरज नाही. त्यांना केवळ डिजिटल लॉकर आणि आधार कार्डवरील माहितीवरून कंपनी सीम कार्ड देणार आहे. तसा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र आधार पडताळणी करताना कंपन्यांना संबंधित ग्राहकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. यामुळे आता ग्राहकांना घरबसल्या नवीन सीमकार्ड मिळणार आहे.

एखाद्या व्यक्तीला कोणत्याही मोबाईल कंपनीचे नवीन सीम कार्ड घ्यायचे असेल तर त्याला कंपनीच्या वेबसाईटवर अर्ज भरावा लागेल. हा अर्ज भरताना पर्यायी मोबईल क्रमांक द्यावा लागेल. त्यावर ओटीपी पाठवून कंपनी अर्जदाराची पडताळणी करील. त्यानंतर डीजी लॉकर किंवा आधार कार्डमधून त्याची माहिती कंपनी पडताळून पाहिल. या फार्मवर अर्जदाराला फोटो डाउनलोड करावा लागणार आहे. त्यानंतर कंपनी ग्राहकाला सीमकार्ड पाठवेल. ग्राहकाची संपूर्ण पडताळणी झाल्यानंतर हे सीम कार्ड सुरू होईल. पोस्टपेड आणि प्रीपेड यात सीम कार्ड बदलण्याबाबतही दूरसंचार मंत्रालयाने नवीन नियमावली जारी केली आहे. त्यानुसार हे बदल केले जाणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button