Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

बीईएमएलच्या खासगीकरणासाठी 6 बड्या कंपन्यांनी बोली लावली

नवी दिल्ली – बीईएमएलच्या खासगीकरणाला आता वेग आला आहे. त्यातील सरकारची हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी 6 पेक्षा अधिक बड्या कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे. त्यामुळे या खासगीकरणाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यात सरकार 26 टक्के भागीदारी विकणार आहे.

वाचा ;-१ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस घेता येणार

बीईएमएलमध्ये केंद्र सरकारची 54 टक्के हिस्सेदारी आहे. निर्गुंतवणुकीच्या धोरणानुसार सरकार ही हिस्सेदारी विकणार आहे. पहिल्या टप्प्यात 26 टक्के हिस्सेदारी व्यवस्थापन नियंत्रणासह विकण्यात येणार आहे. त्यासाठी निर्गुंतवणूक विभागाने निविदा मागवल्या होत्या. त्यासाठी 22 मार्च ही शेवटची मुदत देण्यात आली होती. या मुदतीत आतापर्यंत 6 पेक्षा अधिक प्रस्ताव आले आहेत, अशी माहिती डीआयपीएएमच्या सचिवांनी दिली. या निर्गुंतवणूकीसाठी एसबीआय कॅपिटलची सल्लागार म्हणून केंद्र सरकारने नियुक्ती केली आहे. बीईएमएल ही सरकारी कंपनी संरक्षण विषयक उत्पादनांची निर्मिती करते. त्यात पृथ्वी क्षेपणास्त्र, लष्कराची वाहने, रेल्वे आणि मेट्रोच्या बोगींचा ही समावेश आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button