breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2019; अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून अंतरिम अर्थसंकल्प सादर

मुनगंटीवारांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे –

  • कोतवालांच्या मानधनात 50 टक्के वाढ. 50 वर्षांहून अधिक वय असलेल्या कोतवालांच्या मानधनात तिप्पट वाढ
  • महिलांच्या सुरक्षेसाठी ‘महिला सुरक्षितता पुढाकार’ योजना राबवणार, यासाठी 252 कोटी रुपये राखीव.
  • जलयुक्त शिवार अभियानातंर्गत 6 लाख 2 हजार मृद आणि जलसंधारणाची कामं पूर्ण. त्या माध्यमातून 26.90 TMC पाणीसाठा क्षमता निर्माण. या योजनेवर 8 हजार 946 कोटी खर्च.महाराष्ट्र बजेट LIVE: 66 लाख 88 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफी रक्कम
  • 2 हजार 61 महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्राची यशस्वी उभारणी करण्यात आली, उर्वरित मंडळांमध्ये काम प्रगतिपथावर.
  • ओबीसी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी 36 वसतिगृह सुरू करण्यात येतील. याशिवाय ओबीसी महामंडळासाठी 200 कोटी रुपये राखीव.
  • राज्यातल्या चार कृषी विद्यापीठांसाठी 600 कोटींची तरतूद
  • 80 टक्के दिव्यांग असलेल्या व्यक्तींना सरकारच्या घरकुल योजनेचा लाभ मिळणार
  • समृद्धी महामार्ग 10 जिल्ह्यांमधून जाणार. 1 जानेवारी 2019 पासून काम सुरू करण्यात आलं आहे.
  • मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचं अंतर कमी करण्याचा आराखडा प्रस्तावित, त्यासाठी 6 हजार 695 कोटी रुपये खर्चाचा अंदाज.
  • गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेचा आता अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनाही लाभ मिळेल.
  • राज्यातल्या सर्व गावांतील गावठाणची मोजणी 36 महिन्यांत पूर्ण करणार.
  • 66 लाख 88 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली.
  • रोजगार हमी योजनेअंतर्गत काही नियम शिथिल करण्यात आले.
  • 1,635 चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. शेळी-मेंढीसाठी चारा छावण्या प्रथमच सुरू करण्यात आल्या आहेत.
  • कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी 6,410 कोटी रुपयांची तरतूद.
  • गेल्या 4 वर्षांत ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेअंतर्गत 1 लाख 67 हजार शेततळी पूर्ण.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button